शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

रिमझिम पावसाने पिके बहरली

By admin | Published: September 09, 2014 11:34 PM

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो.

७९ टक्के पाऊस : दोन जलाशयातून साठ्यापेक्षा अधिक विसर्गगोंदिया : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ९२१.०३ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वातावरणातील या बदलामुळे काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील चार मुख्य जलाशयांपैकी पुजारीटोला व कालीसराड या दोन जलाशयातून जलसाठ्याच्या क्षमतेएवढे पाणी खरीप पीक वाचविण्यासाठी सोडण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडणे सुरूच आहे. अशीच स्थिती राहीली तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलाशय रिक्त होतील, अशी चिंता संबंधित विभागात व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयाच्या जलसाठ्याची क्षमता ३१८.८५ दलघमी आहे. सिरपूर जलाशयाची १९२.५२ दलघमी, पूजारीटोलाची ४८.६९ दलघमी व कालीसराड जलाशयाची २७.७५ दलघमी जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत कालीसराडच्या डाव्या कालव्यातून ४४.९७४ एमएमक्यू व उजव्या कालव्यातून २७.०४७ एमएमक्यू पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ७२.०२१ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. याशिवाय इटियाडोह जलाशयातून ७०.६२ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इटियाडोहाच्या डाव्या कालव्यातून आताही पाणी सोडले जात आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस योग्य प्रमाणात पडला नाही. त्यामुळे पूजारीटोला, कालीसराड व इटियाडोह जलाशयातून सिंचनासाठी वेळेपूर्वीच पाणी सोडावे लागले. सिंचन विभागाच्या म्हणण्यानुसार २५ आॅक्टोबरपर्यंत शेतातील पीक वाचविण्यासाठी पाणी सोडण्याचा शासकीय आदेश आहे. त्यानुसार आता दीड महिन्यापर्यंत पाणी सोडले जावू शकते. परंतु जलसाठा कमी झाला तर पाणी सोडण्यात समस्या उद्भवू शकते. यानंतरही कमीत कमी एक महिन्यापर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले जाईल. (प्रतिनिधी)