शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

स्त्री, घर व समाज एकत्र आल्यास व्यसनमुक्ती शक्य

By admin | Published: January 24, 2016 1:44 AM

जिकडे तिकडे दारूबंदी होते पण व्यसनमुक्ती होत नाही. आज घडीला दारू, तंबाखूृ खर्रा, गुटखा याचे सेवन करणे म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते.

महिलांची परिचर्चा : व्यसनाधिनता थांबविण्यात महिलांचा सहभागगोंदिया : जिकडे तिकडे दारूबंदी होते पण व्यसनमुक्ती होत नाही. आज घडीला दारू, तंबाखूृ खर्रा, गुटखा याचे सेवन करणे म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते. दारूबंदी साठी आम्ही मोर्चे काढतो. सरकारी दुकाने बंद केली परंतु दुकाने बंद करून खरच व्यसनमुक्ती होते का? असा सवाल करीत जेव्हापर्यंत घरातील स्त्री व्यसनाच्या विरोधात ताठ उभी राहात नाही, तिच्या पाठिशी अख्खे घर व समाज एकत्र येत नाही तेव्हापर्यंत व्यसनमुक्त समाजाची निर्मीती होऊ शकत नाही, असा सूर गोंदियात आयोजित देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात ‘व्यसनाधिनता थांबविण्यात महिलांचा सहभाग’ या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने निघाला.या चर्चासत्राला चंद्रपूरच्या आ.शोभा फडणवीस, पुणे येथील आ.मेधा कुळकर्णी, मुक्तांगण या संस्थेमार्फत चालविल्या जणाऱ्या निधीगंधच्या प्रमुख प्रफुल्ला मोहीते, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विलास, जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे सहभागी झाल्या होत्या. महिलांनी महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्र उघडून महिलांना व्यसनमुक्त केले. महाराष्ट्रात आजघडीला दिड कोटी लोक व्यसन करीत असल्याच्या प्रफुल्ला मोहीते म्हणाल्या. मुक्ताताई पुणतांबेकर म्हणाल्या, व्यसनाचा त्रास सर्वात जास्त महिलांना होतो. आई, पत्नी, मुलगी, बहीण यांना त्रास होतो. पती दारू पिऊन आला आणि पत्नी शांत असली तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिला चिडवण्याचे काम व्यसनी पती करीत असते. तरीही पत्नी शांत असली तर व्यसनी पत्नी तिच्या चारित्र्यावर उगाचच प्रश्नचिन्ह करतो. त्यात चारित्र्याच्या बाबीला सहन न करणारी पत्नी पतीला उतर दिल्यास तेथे वाद होते. परंतु व्यसनी पतीच्या नादी लागू नका कारण त्याची दारू उतरल्यावर त्या व्यसनी पतीला स्वत: अपराधीक असल्याच वाटते. पती दारू पिऊन आला की तो आरडा-ओरड करते, तिला मारहाण करेल किंवा साहित्य फेकफाक करते. त्यामुळे महिलांच्या मनात नकारात्मक भावना घर घेते. आ. मेधा कुळकर्णी म्हणाल्या, दारूही दारूसंबधी राहात नाही तर ती दारू इतर गुन्ह्यांसंबधी असते. दारूमुळे अपघाताचे प्रमाण वाढतात. बलात्काराच्या बहुतांश घटना दारूप्राशन केल्यानंतर झाल्याचे लक्षात आले. दारूबंदी करून अपघात, बलात्कार थांबणार का? तर मनातून दारूबंदी झाल्यास हे शक्य होईल. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विलास म्हणाल्या आम्ही काही दिवसापूर्वी मुंबई येथील २५ महाविद्यालयांचा सर्वे केला त्यात तरूणी मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढत असल्याचे लक्षात आले. आम्ही त्यांना सिगारेट का ओढता असे विचारल्यावर त्यांनी फिगर मेंटेनन्स ठेवण्यासाठी पित असल्याचे सांगितले.प्रफुल्ला मोहीते म्हणाल्या, सहज सर्व गोष्टी उपलब्ध असल्यामुळे व्यसन वाढले आहे. सद्या सिगारेट, गांजा, चरस, नेलपेंट, पेट्रोल, कफसिरप, झोपेच्या गोळ्या, डॉक्टर व नर्सेस इंजेक्शन घेतात हे व्यसन सद्या सुरू आहे. सिगारेट ओढण्यात अमेरीकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आ. मेधा कुळकर्णी म्हणाल्या, व्यसनाची स्पर्धा मुलींमध्ये होऊ लागली आहे. त्यासाठी प्रत्येक घर खुल्या संवादाचे माध्यम व्हावे. आईने मुलांशी मैत्रीणीची भूमिका ठेवावी, परीक्षा, ब्रेकप यातून सावरण्यासाठी खुला संवाद महत्वाचा आहे. मुक्ताताई पुणतांबेकर म्हणाल्या, दारूच्या नवऱ्याच्या नादी न लागता दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने आपले दुख सहचारिणीला सांगा त्यासाठी आम्ही आधारगट बनवला आहे. आजच्या काळात मिडीयाचा परिणाम विद्यार्थ्यान्या मनावर फार लवकर होते. उत्सुकता म्हणून अनेक लोक दारू पितात परंतु हीच उत्सुकता एक दिवस व्यसन होऊन जाते. रचना गहाने यांनीही गोंदिया जिल्ह्यात तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट, गुडाखू, नस अश्या विविध व्यसनासंबधी माहिती दिली. आ. शोभा फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या दारूबंदीचे अनेक दाखले देत सरकारी दुकाने बंद करून दारूबंदी होत नाही तर त्यासाठी मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील जे लोक दारूपिऊन मृत्यू पावले त्यांच्या आता विधवा पत्नी तोच दारूचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. दारूबंदीसाठी विनवणी करणाऱ्या मुलीची परिस्थिती मांडली. त्या मुलीला आपल्या व्यसनमुक्ती मंडळात घेतले. परंतु दारूबंदी साठी निवडणूक होताच व्यसनमुक्तीसाठी काम करणारी ती मुलगी ८०० रूपयासाठी दारूविक्रेत्यांना मतदान करते ही खंत त्यांनी या चर्चासत्रातून व्यक्त केली. रस्ते बनविणे म्हणजे विकास नाही, प्रकल्प उभारणे म्हणजे विकास नाही तर मानिसिकता बदलने हा खरा विकास आहे. शेजारी वाद सुरू असला आणि तो वाद सोडविण्यासाठी आपला मुलगा गेला तर त्याला आपण तू यांच्या भानगडीत पडू नको असे बोलून परत घरात आणतो. त्याला आपण मर्द बनवित आहोत की नाही हे आपणच ठरवावे. आज खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त समाजाची गरज आहे. यावेळी प्रमाणात विद्यार्थ्यानची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)