अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. पावसाअभावी ६० पिकांचे नुकसान झाले असून धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्ंिवटंलने घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकºयांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याचे संकट ओढवले आहे.गोंदिया जिल्ह्यातील धान हे मुख्य पीक असून खरिपात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. पण, यंदा पावसाअभावी केवळ १ लाख ५२ हजार हेक्टरवर धानाची लागवड पूर्ण झाली. यापैकी जवळपास ३० ते ४० टक्के शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. तर ६० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. जिल्ह्यात सरासरी १३२७ मि.मि.पाऊस पडतो. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ७५० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.यंदा सरासरीच्या केवळ ४० ते ५० टक्के पाऊस झाल्याने ६० टक्के पिकांचे नुकसान झाले. कमी पावसामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात १२ ते १५ क्विंटलने घट होण्याची शक्यता आहे.दरवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रती हेक्टरी २४ क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात होते. पण, यंदा पावसाअभावी बिकट चित्र आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू क्षेत्रात धानाचे प्रती हेक्टरी उत्पादन पाच ते सहा क्विंटल होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकºयांनी केलेला लागवड खर्च देखील भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी चिंतातूर आहे. तर काही शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे.७० हजार हेक्टरमधील पिके संकटातहवामान विभागाने सुध्दा आता पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचनाची सोय नसलेल्या शेतकºयांची ७० हजार हेक्टरमधील पिके संकटात आल्याचे चित्र आहे.६० टक्के पिकांचे नुकसानपावसाअभावी यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सुरूवातीला कृषी विभागाने पिकांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत लागवड क्षेत्र सुध्दा अधिक दाखविले होते. मात्र लोकमतने याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील ६० पिकांचे नुकसान झाल्याची कबुली दिली असून तसा अहवाल सुध्दा शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे.१९८५ नंतर प्रथमच स्थिती बिकटयंदा पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा ३० ते ३५ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. १९८५ नंतर प्रथमच जिल्ह्यात अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.रब्बी हंगाम धोक्यातखरीप हंगामानंतर जिल्ह्यात रब्बीची पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात यंदा ३६ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने सुरूवातीला वर्तविला होता. मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांची लागवड होण्याची शक्यता आता कमी आहे.शेतकºयांचे लक्ष घोषणेकडेजिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला घेवून सर्वच राजकीय पक्षांकडून जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. तर प्रशासनातर्फे सप्टेंबरनंतर यावर निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे.
पावसाअभावी धानाचे हेक्टरी उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:10 PM
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली.
ठळक मुद्दे६० टक्के पिकांचे नुकसान : उन्हाळी हंगाम धोक्यात