शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुभाष बागेची आबाळ

By admin | Published: October 04, 2015 2:40 AM

बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते.

गोंदिया : बाग आहे मात्र त्याला माळीच नाही म्हटल्यास तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मात्र ही आर्श्चयजनक बाब शहरातील एकमेव सुभाष बागेशी संबंधित आहे. नगर परिषदेच्या या भव्य बागेसाठी माळीच नाही. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बागेची देखरेख व कामकाज प्रभावित होत आहे. शहरातील एकमात्र बागेला सुसज्ज करण्यात येथील नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यातून दिसून येते. शहरात नगर परिषदेची आता एकमात्र सुभाष बाग उरली आहे. बागेच्या अन्य जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही जागांचा अन्य उपयोगासाठी वापर केला जात आहे. अशात सकाळी आणि सायंकाळी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना फिरण्यासाठी फक्त सुभाष बाग उरली आहे. शहरातील प्रदूषणयुक्त वातावरणापासून मुक्त होऊन चार क्षण शुद्ध वातावरणात घालविण्यासाठी शहरवासीयांचा कल सुभाष बागेकडे असतो. शहराच्या ह््दयस्थळी असलेली ही सुभाष बाग बाराही महिने नागरिकांच्या गर्दीने फुललेली असते. बागेतील शुद्ध वातावरणात चकरा मारण्यासाठी किंवा आपल्या बालगोपालांना बागेतील खेळण्यांवर खेळण्या-बागडवण्यासाठी शहरवासी मोठ्या उत्सुकतेने येथे येतात. मात्र बागेत पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नाही. आजघडीला बागेत उगवलेले गवत गुडघ्यापेक्षा जास्त वाढले असून जंगली रोपटेही जिकडेतिकडे वाढलेले दिसते. बागीचा प्रशासनाकडून त्यांची कटाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र बागेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हे काम पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. परिणामी जंगली गवत बागेत झपाट्याने वाढत चालले आहे. याशिवाय बागेत असलेल्या खेळण्यांतील एक-दोन खेळणी तुटलेली असल्याने चिमुकल्यांना त्यावर खेळता येत नाही. त्यांचा हिरमोड होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच या बागेत काही खेळण्यांची दुरूस्ती झाली होती. मात्र वर्षभरात ही खेळणी पुन्हा खराब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.बागेचे सौंदर्य हरपतेयबागेत माळीच नसल्याने वाढलेल्या झाडांची पद्धतशीरपणे कापणी करणे, फुलझाडांची देखरेख, जंगली गवत व झाडांच्या उगवण्यावर उपाययोजना, खत व कीटकनाशक फवारणी करणे आदि कामे बागेत होत नाहीत. परिणामी बागेचे सौंदर्य हरपले आहे. एवढी मोठी बाग असूनही माळी नसणे ही बाब नगर परिषदेसाठी नामुष्कीची ठरत आहे. बागेत येणाऱ्यांना मात्र याचा त्रास होतो. शहरात एकमेव बाग असताना त्याची देखभाल करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र यातून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)