लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डॉक्टरला पैसे न दिल्याने प्रसूतीस उशीर केल्याने बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाल्याची घटना येथील बाई गंगाबाई रूग्णालयात घडली. रविवारी (दि.२६) घडलेल्या या घटनेत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची तक्रार गौरेश पिसे (३०) रा.राका-पळसगाव यांनी शहर पोलिसांत केली आहे.प्राप्त माहितीनुसार गौरेश पिसे यांची पत्नी गुणवंता पिसे (२३) यांना प्रसूतीसाठी शनिवारी (दि.२५) दुपारी १२.३० वाजतादरम्यान येथील बाई गंगाबाई रूग्णालयात भर्ती करण्यात आले. त्यादिवशी कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. पोटातील बाळ साडे तीन किलोचे असताना नॉर्मल डिलीव्हरी करू असे डॉ.श्वेता मस्करे व डॉ.सोनारे यांनी सांगीतले. यादरम्यान दवाखान्यातील एजंट टेंभूर्णीकर याने डिलीव्हरी सुरळीतपणे करण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र पैसे नसल्याने त्यांना पैसे दिले नाही व डॉक्टरांनी रविवारी (दि.२६) रात्री १०.३० वाजता डिलीव्हरी केली असता बाळ पोटातच मरण पावले होते व गर्भाशय फाटले होते. यामुळे गुणवंता यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी गौरेश पिसे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून बाळाचा मृत्यू व पत्नीच्या प्रकृतीसाठी डॉक्टर व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.चौकशी समिती गठीतया प्रकरणाला घेऊन गौरेश पिसे यांच्यासह त्यांचे नातेवाईक व येथील विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मनोज मेंढे यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रूखमोडे यांची भेट घेतली. यावर त्यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटातील बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:11 PM
डॉक्टरला पैसे न दिल्याने प्रसूतीस उशीर केल्याने बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाल्याची घटना येथील बाई गंगाबाई रूग्णालयात घडली. रविवारी (दि.२६) घडलेल्या या घटनेत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची तक्रार गौरेश पिसे (३०) रा.राका-पळसगाव यांनी शहर पोलिसांत केली आहे.
ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रूग्णालयातील घटना : पिसे यांची पोलिसांत तक्रार