लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात यंदा खरीपात १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.जून महिन्यातील संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीची कामे आटोपली. जवळपास ९५ टक्के पेरणीची कामे आटोपली आहे. पेरणी केल्यानंतर एका दमदार पावसाची गरज असते. मात्र मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने केलेल्या पेरण्या सुध्दा संकटात आल्या आहे. पंधरा दिवस पाऊस न झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर उष्णतामानात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी रोवणी सुरू केली आहे. या रोवणीला सुध्दा पावसाची गरज आहे. अन्यथा रोवणी वाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. हवामान विभागाने सुध्दा जुलै ते आॅगस्ट महिन्या दरम्यान १५ दिवसांचा पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातच आता पाऊस पुन्हा गायब झाला असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर कृषी विभागाने पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास पेरण्या संकटात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.जलाशयात अल्प पाणीसाठाजिल्ह्यातील छोट्या, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पात देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जलाशयांना सुध्दा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अन्यथा पुन्हा पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने त्याचा सुध्दा पिकांवर परिणाम होत आहे. तर उकाड्यामुळे नागरिक सुध्दा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कधी दमदार पाऊस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:42 PM
मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर । वरुणराजाकडे लक्ष