लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रशासन एकीकडे जिल्ह्यात चारा टंचाई नसल्याचे सांगतो. मात्र पशुपालकांना चारा टंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीत हतबल झालेला पशुपालक पाळीव जनावरांना विक्रीसाठी काढत आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारांमध्ये जनावरांची गर्दी वाढत चालली आहे.शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी पशुपालन करतात. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट आदी व्यवसाय करतात. परंतु पशुपालनाचा जोडधंदाच आता पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे. जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.शासनस्तरावर बांधण्यात आलेले बंधारे देखील कोरडे असल्यामुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठून करावी, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खरीप व रबी हंगामात धान पीक उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे.यामुळे वाळलेले वैरणदेखील कमी प्रमाणात पशुपालकांकडे आहे. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाराही मिळत नाही. किंबहुना पाण्याअभावी पशुपालकांना हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही घेता येत नसल्याने जनावरांचे पालन पोषणच अवघड होऊ लागले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पशुपालक जनावरांच्या पालन पोषणाला घेवून चांगलेच हतबल झाले आहेत.परिणामी पशुपालक जनावरांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात नेत आहेत. जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिवसेंदिवस विक्रीसाठी आलेल्या जनावरांची गर्दी वाढत आहे.या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पशुपालन संकटात येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.जनावरांसाठी पाणी पुरवठ्याची गरजकोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.जिल्ह्यात ६ लाख पाळीव जनावरेजिल्ह्यात पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहिले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी व पशुपालक गाय, म्हैस पाळून दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर शेळी, मेंढीदेखील पाळतात. जिल्ह्यात गाय व म्हशीची संख्या ३ लाख ६० हजार ५२९ तर शेळी व मेंढीची संख्या १ लाख ५८ हजार १४५ आहे. त्याचप्रमाणे एका वर्षाखालील वासरू व वघारांची संख्या ६२ हजार ११७ आहे. असे एकूण जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पाळीव जनावरे आहेत.प्रति दिवस लागतो २४५२ मेट्रिक टन चाराजिल्ह्यातील जनावरांसाठी जिल्ह्यात प्रतिदिवस २ हजार ४५२ मेट्रिक टन चाºयाची गरज असते. यानुरुप जिल्ह्यात धान उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच वनक्षेत्र असल्याने दरवर्षी चारा टंचाई राहत नाही. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वैरणासह हिरव्या चाºयांची टंचाई काही ठिकाणी दिसून येत आहे.
चारा टंचाईमुळे पशुपालन झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 8:47 PM
मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देफटका दुष्काळाचा : विक्रीसाठी बाजारात जनावरांची गर्दी