शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सातबाऱ्यावरील तांत्रिक अडचणींमुळे धान खरेदी प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 5:00 AM

धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे अशा अनेक अटी टाकलेल्या आहेत. सध्या   जिल्ह्यात विविध सेतू केंद्रामार्फत वा कम्प्युटर कॅफेतून निघणाऱ्या सातबाऱ्यांवर २०१८-१९ या हंगामाचाच पीक पेरा नोंदविलेला आहे. 

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा अडचणीत : भंडारा प्रमाणेच शिथिलता देण्याची गरज

n  लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : गोंदिया जिल्ह्यात  धान खरेदीत पारदर्शकता यावी व शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या खेटऱ्या मारण्यापासून मुक्तता मिळावी या हेतूने घातलेली डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्याची अट आता धान खरेदीत अडथळा निर्माण करीत असून जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रिया रखडली आहे.याबाबत सविस्तर असे की, जिल्हा पणन अधिकारी गोंदिया या कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना ५ दिवसांच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून शेतकऱ्यांकरीता अनेक मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे अशा अनेक अटी टाकलेल्या आहेत. सध्या   जिल्ह्यात विविध सेतू केंद्रामार्फत वा कम्प्युटर कॅफेतून निघणाऱ्या सातबाऱ्यांवर २०१८-१९ या हंगामाचाच पीक पेरा नोंदविलेला आहे. सातबाऱ्यावर चालू हंगाम म्हणजे २०२०-२१ चा पीक पेरा नमूद असणे आवश्यक आहे. परंतु सेतू केंद्रातून कालबाह्य  डिजिटल  सातबारा मिळत असल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा तलाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. सदर पीक पेरा अद्ययावत करण्यातील  पहिली अडचण म्हणजे जिल्ह्यातील तलाठी संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी ९ नोव्हेंबर पासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असणार असून तलाठ्यांना सर्व सातबारे एकाचवेळी अद्ययावत न करता  प्रत्येक सातबाऱ्याचा पीक पेरा एक-एक करून अद्ययावत करावा लागणार आहे. दुसरी बाब म्हणजे, जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी तलाठी स्वाक्षरीत सातबाऱ्याऐवजी डिजिटल स्वाक्षरी धान खरेदी केंद्रावर देण्याची अट घातली आहे. यामुळे सातबाऱ्यावरील तांत्रीक बाब  शेतकऱ्यांसाठी सोयीऐवजी त्यांची अडचण ठरत आहे.

भंडाऱ्यात डिजिटल सातबाऱ्याची अट शिथिलसातबाऱ्यावरील चालू पीक पेरा नोंदविण्याची प्रक्रिया ही लांबलचक असून पीक पेरा अद्ययावत होईपर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाऱ्याची अट पणन अधिकारी भंडारा यांनी शिथिल केली आहे. धान खरेदी केंद्रावर तलाठी हस्तलिखित अद्ययावत पीक पेरायुक्त सातबारे स्वीकारण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा डिजिटल सातबाऱ्याची अट शिथिल करून  हस्तलिखित सातबारे स्वीकारण्यास मुभा देण्याची मागणी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व धान खरेदी केंद्रांनी केली आहे.

पीक पेरा अद्ययावत करण्यात येईलडिजिटल सातबाऱ्यावरील २०२०-२१ या चालू हंगामाचा पीक पेरा अद्ययावत करण्याविषयी तलाठ्यांना सूचना देण्यात आली आहे. लवकरच चालू पिकपेरायुक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारे उपलब्ध करण्यात येतील.         - प्रशांत घोरुडे, तहसीलदार तिरोडा मागणी पूर्ण झाल्यावर आंदोलन मागे घेणारगोंदिया जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना अद्ययावत पीक पेरायुक्त डिजिटल सातबाराऱ्याची गरज असतानाच तलाठी संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी व तलाठयांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले असून मागण्या मान्य झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल.  - एम टी मलेवार, जिल्हाध्यक्ष, तलाठी संघटना गोंदिया

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड