लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. बारदाणा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची मळणीची कामे खोळंबली आहे. त्यातच रविवार आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.महिन्याभरापूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ अर्जुनी मोरगावच्या वतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र पंधरा दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बारदाण्याची टंचाई निर्माण झाली.केंद्रावरुन बारदाणा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही बारदाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी बाजारातून अधिक दराने बारदाणा विकत घेण्याची पाळी शेतकºयांवर आली आहे.उपबाजार समिती यार्डाची साठवणूक क्षमता संपल्यामुळे हे केंद्र आता पुगलिया राईस मिलमध्ये सुरु आहे. बारदाण्याअभावी शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडले आहेत. अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल धान ओले झाल्याची माहिती आहे.खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: ताडपत्र्यांची व्यवस्था करुन पावसापासून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.फेडरेशननेही नवीन बारदाणा केंद्रावर पुरवठा केला नाही. त्यामुळे धान खरेदी रखडली आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धान उघड्यावर पडूनअर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व ९ केंद्रावर आहे. स्वत:च्या बारदाण्यात जो शेतकरी धान्य देतो त्यांच्याकडूनच धान खरेदी केली जात आहे. तर अन्य शेतकऱ्यांचे धान तसेच उघड्यावर पडून आहे. संस्थेच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना प्रति बारदाना १५ रुपये देण्याचा प्रस्ताव बैठकीत घेण्यात आला. मात्र याला काही संचालकांनी विरोध केल्याची माहिती आहे.
खरेदी केंद्रावरील धानाला अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:30 PM
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. बारदाणा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची मळणीची कामे खोळंबली आहे.
ठळक मुद्देबारदाण्याचा अभाव : नवेगावबांध खरेदी केंद्रावर खरेदी रखडली