शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

वृक्षारोपणासाठी तीन हजार खड्डेच खोदून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 9:59 PM

३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत यंदा नगर परिषदेला पाच हजार ६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन सुर केले असून शहरातील विविध भागांत आतापर्यंत सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे५६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट : नगर परिषदेचे नियोजन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत यंदा नगर परिषदेला पाच हजार ६०० वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन सुर केले असून शहरातील विविध भागांत आतापर्यंत सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. १ जुलैपासून वृक्ष लागवड अभियानाला सुरूवात झाली असून नगर परिषद यंदा तरी टार्गेट पूर्ण करते की नाही हे बघायचे आहे.घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येमुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बदलते वातावरण हे त्याचे सूचक आहेत. अशात पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. वृक्ष लागवडीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविली जात असून यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने नगर परिषदेला ४ हजार ७०० वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे. मात्र यंदा नगर परिषद टार्गेट पेक्षा जास्त वृक्ष लागवड करणार असल्याचे ठरवून ५ हजार ६०० वृक्ष लागवडीचे नियोजन करीत आहे.त्यानुसार, नगर परिषद वृक्ष लागवडीच्या कामाला लागली आहे. यासाठी संबंधित अभियंता पूर्ण अभियानासाठी नियोजन करीत असून शहरातील विविध भागांत अद्याप सुमारे तीन हजार खड्डे खोदण्यात आल्याची माहिती आहे.१ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ झाला असून नगर परिषद आताही खड्डेच खोदत असल्यान हे अभियान थंडावणार तर नाही शंका येत आहे.असे केले नियोजन३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेने स्टेट बँक कॉलनी ते साई माऊली कॉलनीपर्यंत ५०० रोपटी, छोटा पाल चौक ते बालाघाट रेल्वे क्रॉसींग पर्यंत ३००, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर २००, शहरातील कुंभारेनगर परिसरातील नगर परिषद डॉ.आंबेडकर स्कलमध्ये ३००, सिव्हील लाईन्स नूतन विद्यालयात २००, शासकीय टेक्निकल स्कूलमध्ये २००, गोविंदपूर परिसरातील नगर परिषद बालक मंदिरात ३०, गोविंदपूर नगर परिषद प्राथमिक शाळेत ३०, नगर परिषद कार्यालय परिसरात १००, चौरागडे मेडीकल ते अंगून बगिचा परिसरात ५००, सिव्हील लाईन्स साई मंदिर परिसरात ५००, सिंधी स्कूल ते बाजपेई चौकपर्यंत ५०० तर हड्डीटोली क्रॉसींग ते मरारटोली रस्तापर्यंत एक हजार वृक्ष लागवडचे नियोजन केले आहे.खड्डे खोदण्याचे काम त्याच एजंसीलानगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एका एजंसीने कर्मचाऱ्यांचे मागील कित्येक महिन्यांचे पगार दिले नसल्याने कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.यावर सर्वसाधारण सभेत या एजंसीचे मनुष्यबळ पुरवठ्याचे तीन वर्षांचे कंत्राट रद्द करून एक वर्ष करण्यात आले आहे. सहा-सात महिन्यांपासून कर्मचाºयांना पगार न देणे, शिविगाळ करणे आदी प्रकार कंत्राटदार करीत असूनही त्याच्यावर नगर परिषदेने काहीच कारवाई न केल्यान सर्वांनाच आश्चर्य होत आहे. असे असतानाच वृक्ष लागवडसाठी खड्डे खोदण्याचे काम या वादग्रस्त एजंसीलाच देण्यात आले असल्याची माहिती आहे. यामुळे या एजंसीवर एवढी मेहरबानी का केली जात असल्याची चर्चा नगर परिषद वर्तुळात सुरू आहे.