लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : ब्रिटेनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे देशभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाचा संसर्ग देशात वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ब्रिटनसह इतर देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळ आणि जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. तसेच त्यांची चाचणी करुन आणि लक्षणे नसल्याची खात्री करुनच त्यांना घरी जाण्याची परवानगी आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.
स्वतंत्र क्वारंटाईन कक्षब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करुन त्यांना तंत्रनिकेतन विद्यालयात तयार केलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.- डाँ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया.
एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले ७५४ जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विदेशातून एकूण ७५४ जण परतले आहेत. यात सर्वाधिक नागरिक दुबई येथील आहे. बरेच जण दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे नागरिक आपल्या स्वगृही परतले आहेत. तर काही नागरिक इतर देशातून परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांना याची माहिती जिल्हा प्रशासनाने देणे अनिवार्य आहे. यानंतर या नागरिकांची मेडिकलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस शासकीय क्वारंटाईन कक्षात आरोग्य विभागाच्या निदर्शनाखाली ठेवले जात आहे.