गोंदिया : आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजघडीला पारंपरिक आणि दुर्मिळ रानभाज्या दैनंदिन आहारामध्ये सेवन करण्याची गरज आहे. विविध औषधी रानभाज्या व वनउपज अन्न मानवी आरोग्यास उपयुक्त आहेत. रानभाज्या सेवनामुळे मानवी शरीर सशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला ४० प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात. औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. पातूर भाजी, उंदीरकानी, करांदे,वडघर, कडूकंद, कोणताही अळू, तांदूळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ, करटोली, वाघेडी, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी,तरोटा,मोहफुल कुडाच्या शेंगा अशा रानभाज्या गोंदिया जिल्ह्यात आहेत.
..................
या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?
कंदभाज्या- रानभाज्यांमध्ये कंदस्वरुपात असलेल्या भाज्यांमध्ये पातूर भाजी, उंदीरकानी, करांदे ,वडघर, कडूकंद, कोणताही अळू इत्यादी.
...............
हिरव्या भाज्या- तांदूळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ इत्यादी.
................
फळभाज्या- या फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडी, चिचुर्डी,पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादींचा समावेश आहे.
.................
फुलभाजी- रानभाज्यांत फुलं असलेल्या भाज्यांमध्ये कुडा,शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा,मोहफुल कुडाच्या शेंगा यांचा समावेश आहे.
.......................
पावसाळा रानभाज्यांवर: गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात रानभाज्यांना पसंती आहे. महागडी भाजी बाजारातून घेण्यापेक्षा रानभाज्यांवरही आपले घर चालविले जाते. पावसाळ्यात रानभाज्या व परसबागेत लावलेल्या भाज्यांतून पावसाळा ग्रामीण लोक काढतात.
................
या रानभाज्या झाल्या गायब
तांदूळजा: या रानभाज्यांची संख्या अत्यंत कमी होऊ लागली आहे. दरवर्षी जंगलांना लागणाऱ्या आगी त्यामुळे वनस्पती व जंगले नष्ट होत आहेत. त्याचबरोबर भाज्याही नष्ट होत आहेत.
..........
घोळ कवळा: विशेषत: जंगलात तलावाच्या काठावर दिसणारी ही भाजी आताही गोंदिया जिल्ह्यात आहे; परंतु तिचीही संख्या कमी होत आहे.
...........
शक्तीवर्धक रानभाज्या
गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असतात. औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त रानभाज्या आहेत. या रानभाज्यांचे सेवन करणे हे शरीरासाठी शक्तीवर्धक आहे.
डॉ. श्रीराम भुस्कुटे, वनस्पती शास्त्र