बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियमांतर्गत बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे तसेच शाळेत कधीही दाखल न झालेली बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल अशा ६ ते १४ वयोगटातील बालक एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असेल तर त्या बालकांना शाळाबाहय बालक म्हटले जाते. अशा बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करण्याची मोहीम सध्या सुरु आहे. याच मोहीमेतंर्गत राधिका लक्ष्मण जांगळे इयत्ता १ ली, टिकेश्वर लक्ष्मण जांगळे इयत्ता ७ वी, मिथिलेश चंद्रिका पाठक इयत्ता २ री, अंशु मानकु यादव इयत्ता १ ली यांना शाळेत दाखल करण्यात आले. यावेळी देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी. साकुरे, लोहाराचे केन्द्रप्रमुख सत्यवान गजभिये, शिक्षक जी.बी.देसाई उपस्थित होते. यावेळी लोहारा शाळेत भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महिला दिन कार्यक्रम विषयी विचारपूस केली. गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी लोहारा शाळेचे मुख्याध्यापक जे. एम.टेंभरे यांनी शिक्षणाधिकारी यांचे भेटीबद्दल आभार मानले.
शिक्षणाधिकारी यांनी केले शाळाबाहय बालकांना दाखल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:32 AM