शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

योजनांची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:49 PM

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : गणतंत्र दिन उत्साहात साजरा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात गणतंत्र दिनाच्या दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात शुक्रवारी (दि.२६) ते बोलत होते. पुढे बोलताना पालकमंत्री बडोले यांनी, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकर्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी ४ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करु न देण्यात आला असून रमाई आवास योजनेतून यावर्षी ५ हजार घरकुल बांधण्यात येणार आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १० हजार ३६० घरे व शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ४६७ घरकुल बांधण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८४ हजार २७२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ४५ हजार ७१३ पात्र शेतक ºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकºयाला कर्जमाफीचालाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु च राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत, यावर्षी १ कोटी ३५ लक्ष रु पये तसेच जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन व तीर्थस्थळांच्या विकासासाठी ४ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करु न देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन व तीर्थस्थळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येण्यास मदत होणार असल्यामुळे त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्र ांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगत त्यांनी, यावर्षी जलयुक्तमध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली असून ४३४ कामे पूर्ण झाली आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत ५६७ उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी माविमच्या पुढाकारातून जिल्ह्यातील ६२ हजार ४८६ महिला ५०४३ बचतगटांच्या माध्यमातून संघटीत झाल्या असून अनेक महिलांनी उद्योग व्यवसायाला सुरु वात केली आहे. रोहयोच्या माध्यमातून डिसेंबर अखेर १ लाख २७ हजार कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्र माला आमदार गोपालदास अग्रवाल, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जि.प.अपर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्र म सादर करण्यात आले. यामध्ये गुरु नानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर, राजस्थान कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी ओडीसी लोकनृत्य व मुंडीपार येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने शो ड्रील सादर केली.आकर्षक ठरली परेडध्वजारोहणानंतर पालकमंत्री बडोले यांनी परेडचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते सहभागी होते. परेडमध्ये पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, पुरु ष व महिला होमगार्ड, विशेष व्याघ्र जंगल पथक, राष्ट्रीय छात्रसेना पथक, महाराष्ट्र छात्रसेना पथक, राज्य राखीव दल, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, फिरते न्यायवैद्यक पथक, श्वान पथक, बाँब शोध पथकाचा समावेश होता. तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवा, जलद बचाव दल, जि.प.आरोग्य विभाग चित्ररथ, सामाजिक वनीकरण विभाग चित्ररथ, जि.प.सर्व शिक्षा अभियान चित्ररथ, जलयुक्त शिवार चित्ररथ, अग्नीशमन दल, पब्लीक स्कूल वन बचाव, आदर्श कॉन्व्हेंट पथक, मिलिटरी स्कूल पथक यांनीही यामध्ये सहभाग घेतला. ही परेड कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र ठरली.