चंद्रकांत पुलकुंडवार : क्षयरोग जनजागृती कार्यक्र म साजरा गोंदिया : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जातात. अशा क्षयरुग्णांना शासनातर्फे देण्यात येणारा औषधोपचार डॉटस् देणे रोगमुक्तीसाठी सोयीस्कर झाले आहे. डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे आणि औषधोपचार पूर्ण कालावधीपर्यंत घेणे आवश्यक आहे. क्षयरोग हा पहिल्या टप्प्यातच दुरुस्त होवू शकेल, नाहीतर ड्रग रेजिस्टंट होण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कुंवर तिलकसंह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्तवतीने क्षयरोग जनजागृती सप्ताहांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत क्षयरोग जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केविलया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस.भुमकर उपस्थित होते. संचालन प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमकर यांनी मानले. कार्यक्र मासाठी जिल्हा डॉट्स प्लस टीबी एचआयव्ही पर्यवेक्षक सी.बी.भुजाडे, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे, हरिष चिंधालोरे, अमित मंडळ, डी.सी.डोंगरवार, पंकज लुतडे, नगरारे, गजभिये, अग्रवाल, विलास राठोड, राजु मेश्राम, भोजेंद्र बोपचे, संजय भागवतकर, मंजुश्री मेश्राम, वाय.पी.अडसड, अशोक मुडपीलवार, लक्ष्मी उज्जैनवार, लता कांबळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्थेचे कर्मचारी, बाई गंगाबाई स्त्री रु ग्णालय, नर्सिंग शाळेच्या प्राचार्य सुखदेवे व प्रशिक्षणार्थी आणि राधाबाई नर्सिंग शाळेचे प्रशिक्षार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम ‘डॉटस्’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2017 2:37 AM