गोपालदास अग्रवाल : गोंदियात मुद्रा योजना मेळावा व उत्कर्षची सभा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बेरोजगार युवक-युवती आणि गरजू व्यक्तींना उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबी बनविण्यासाठी त्वरित कर्ज देण्याची सुविधा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना रोजगार उभारुन स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी मुद्रा बँक योजना प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येथील जैन कुशल भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्तवतीने शुक्रवारी (दि.१६) आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा व उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, लेखा अधिकारी बावीसकर, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष दिपाली वैद्य, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, सहायक रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक राठोड, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या आर्थिक साक्षरता कक्षाचे व्यवस्थापक पहिरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थिती होत्या. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, मागील दोन वर्षात मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १२३ कोटी रूपये कर्ज रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगत, यापूर्वी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांनी रोजगार निर्मितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करु न दिलेले नाही. गोंदियात बचतगटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री करण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या जागेवर मॉल उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ही वन विभागाची जागा माविमला मिळाली पाहिजे यासाठी आपला आग्रह राहणार आहे. या जागेवर हॉल, शॉपींग, कॉम्पलेक्स व माविमचे कार्यालय अशी एक चांगली वास्तू बनविण्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्यात येईल. बचतगटाच्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम माविम करीत असल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मेंढे यांनी, बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत महत्वाची आहे. या कर्ज सुविधेचा लाभ बचतगटातील महिलांना मिळाला पाहिजे. बचतगटामुळे महिला आता सक्षम झाल्या आहेत. बचतगटातील महिलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असून माविमच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या प्रगतीला दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. महिरे यांनी, बचतगटामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला सुरु वात झाली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वैयक्तीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बचतगटातील महिलांना शासकीय इमारतीत खाणावळ तसेच कॅन्टीन सुरु करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करु न देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. मार्गदर्शक म्हणून बोलतांना श्रीवास्तव यांनी, मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून तीन गटात कर्ज उपलब्ध करु न दिल्या जाते. जी गरजू व्यक्ती आहे, ज्याला उद्योग व्यवसाय सुरु करण्याची आवड आहे त्याने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. बँकांकडून मुद्रा योजनेसाठी कर्ज मागण्यास येणाऱ्या व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध करु न देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. कोणतीही बँक मुद्दामहून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असेल तर त्यावर निश्चित कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले. उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राची सर्वसाधारण सभा यावेळी घेण्यात आली. व्यवस्थापक मोनिता चौधरी यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्ष दिपाली वैद्य, सचिव तुलसी चौधरी यांच्यासह केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या वेध उत्कर्षाचा सन २०१६-१७ च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बचतगटातील उत्पादित मालाच्या विक्र ीचे तसेच जिल्हा उद्योग केंद्र, बँक आॅफ इंडिया, जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या विविध योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोसे यांनी मांडले. संचालन योगिता राऊत यांनी केले. आभार मोनिता चौधरी यांनी मानले. कार्यक्र मासाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, प्रियंका मुंजे, नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रफुल्ल अवघड, एकांत वरधने, केंद्राचे व्यवस्थापक मोनिता चौधरी, लेखापाल आशिष बारापात्रे, उपजिविका समन्वयक कुंदा डोंगरे, क्षमता बांधणी समन्वयक चित्ररेखा जतपेले, सहयोगीनी सुनिता कटरे, हेमलता पडोळे, कुंजलता भुरकुडे, तेजश्वरी येरकुडे, पुनम साखरे, सुर्यकांता मेश्राम, रोहिणी साखरे, शालु मेश्राम आदिंनी सहकार्य केले. बचतगट व महिलांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून झाशीची राणी ग्रामसंस्था पिंडकेपार, सर्वात जास्त १० लक्ष १० हजार कर्ज घेणाऱ्या बाघोली येथील महेश्वरी महिला बचतगट, ८ लक्ष रु पये कर्ज घेणारा अंभोरा येथील सावित्री महिला बचतगट, उत्तम पशुसखी म्हणून डव्वा येथील सुनिता ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी म्हणून सुनिता कटरे, कुंजलता भुरकुडे, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून गिता भोयर, उत्कृष्ट उद्योजक म्हणून एकोडी येथील गुल महिला बचतगट, उत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून राणु वर्मा यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील शिशु गटातून बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने चिचगाव येथील सरिता रहांगडाले यांना शिवणकामासाठी ४५ हजार रुपये कर्जाचे मंजूरीपत्र, स्टेट बँक आॅफ इंडियाच्यावतीने येथील हितेंद्र राहूलकर यांना किशोर गटातून एक लक्ष रु पये कर्जाचे मंजूरीपत्र, गोरेगाव येथील दिगंबर बंसोड याला किशोर गटातून एक लक्ष २० हजार रु पये दुग्ध व्यवसायासाठी कर्जाचे मंजूरीपत्र, कामठा येथील बँक आॅफ इंडिया शाखेच्यावतीने ३ लाभार्थ्यांंना शिशु गटातून कर्जाचे मंजुरीपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
मुद्रा योजना प्रभावीपणे राबवा
By admin | Published: June 18, 2017 12:21 AM