विजयनगर गोंदीया येथे १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ४ आरोपींनी आपल्या हॉटेलमधून पार्सल न देता ग्राहकांना प्लेटमध्ये नास्टा देऊन गर्दी केली. यासंदर्भात पोलीस शिपाई आशिष शेंडे यांनी कारवाई केली आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९, सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियन २००५ सहकलम ११ महाराष्ट कोविड अधिनियम २०२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार हॉटेलचालकांनी १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता नास्टा दुकान सुरू ठेवून लोकांना पार्सल न देता परस्पर लोकांना प्लेटमध्ये नास्टा देऊन लोकांची गर्दी केली. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम ११ महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० अन्वये गुन्हा केला आहे.
आठ हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:28 AM