गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागील बाजूला स्मशानभूमी परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी १७ ऑक्टोबर रोजी चिलीम पिणाऱ्या आठ जणांना रामनगर पोलिसांनी पकडले. त्यांच्याजवळ अवैधरीत्या नशायुक्त पदार्थ गांजा होता. चिलममध्ये गांजा टाकून नशा करताना ते आढळले.
दिपांशू धारासिंग चव्हाण (२२), रा. पांडे ले आउट अंगूर बगीचा गोंदिया, नोवेल अंथोनी सायमन (२२) रा. नूतन शाळेच्या मागे रामनगर, रोनित नैनसिंग मरसकोल्हे (२१) रा. बसंतनगर गोंदिया, हर्ष छविंद्र वाघमारे (२१) रा. नारायणनगर गोंदिया, धनंजय ऊर्फ अमन रमन ऊके (२१) रा. अयोध्यानगर रिंगरोड गोंदिया, हर्षल प्रदीप घोडेस्वार (२५) रा. सिरपूर / रावणवाडी बुद्धविहार मरारटोली गोंदिया, वैभव महेंद्र भगत (२०) रा. टी. बी. टोली गोंदिया, प्रशांत जयेंद्र दमाहे (२०) रा. बाजार चौक रामनगर गोंदिया अशा आठ आरोपींविरुद्ध रामनगर पोलिसात भादंविच्या कलम २७ अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे, पोलिस हवालदार राजेश भुरे, पोलिस हवालदार सुनीलसिंग चव्हाण, पोलिस हवालदार छत्रपाल फुलबांधे, पोलिस नायक बाळकृष्ण राऊत, पोलिस शिपाई कपिल नागपुरे यांनी केली आहे.