लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय देणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुरूवारी (दि.६़) रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली. रामनगर पोलीस ठाण्यांत कार्यरत चार तर गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.गोंदिया शहरात जुगार अड्डे, दारू, सट्टापट्टी व इतर अवैध धंदे सुरू आहेत. परंतु शहरातील पोलीस शिपाई अवैध व्यावसायिकांना अभय देत असून कारवाई करण्याकरीता टाळटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या. या आठ पोलिस शिपायांना पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी निलंबित केले आहे. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत बीट क्र. २ येथील पोलीस हवालदार कृष्णराम खेमराज ठाकरे बक्कल क्र.२९८, प्रितमकुमार खामले बक्कल क्र.७५१, अनिल पारधी बक्कल क्र. ६७१, हिरादास पिल्लारे बक्कल क्र. ५३०, गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील बीट क्र.१ छोटा गोंदियाचे बीट जमादार पोलीस हवालदार सुरेश मेश्राम बक्कल क्र. ७१२, बीट क्र. २ सराफा लाईनचे बीट जमादार सहाय्यक फौजदार मारोती गोमासे बक्कल क्र. ४२५, राजानंद वासनिक बक्कल क्र. ७५५ व बीट क्र.३ गणेशनगर सांभाळणारे पोलीस हवालदार इंदल आडे बक्कल क्र. ४८५ यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान पोलीस अधिक्षकांच्या धडक कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.तपास उशीरा करणारे दोन कर्मचारी निलंबितआमगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नायक शिपाई कुलदीप कोहळे बक्कल क्र.२५२ याने एका चोरीच्या प्रकरणाचा तपास १४ महिने न करता प्रकरण स्व:कडे ठेवले. पोलीस गणवेश न घालणे किंवा अन्य कामात अनागोंदी कारभार करीत असल्याच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी ठाणेदारांनी हटकले असता त्यांनाच धमकी दिली. त्यामुळे त्याला ३० आॅगस्टला निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय कारंजा देण्यात आले आहे.प्रशिक्षणात कॉपी करणारा शिपाई निलंबितगोंदिया जिल्हा पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई विजय नशीने बक्कल क्र. १२४ याला ९ ते १६ जुलै २०१८ दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान या परीक्षेत विजय नशीने कॉपी करताना आढळला. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या आदेशान्वये त्याला निलंबित करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात आठ पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 2:12 PM
गोंदिया शहरातील अवैध व्यावसायिकांना अभय देणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुरूवारी (दि.६़) रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाईअवैध धंद्यांना अभय देणे भोवले