ऑनलाईन लोकमतगोंदिया : भारतीय जनता पक्षाचे नगर परिषदेतील पूर्ण सत्तेचे स्वप्न यंदा फिस्टकले. सर्वांच्या पसंतीचे बांधकाम समिती सभापतीपद भाजपच्या हातून निसटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य विजय रगडे यांनी ऐनवेळी आघाडीला (कॉंग्रेस व नगर विकास आघाडी) मत दिल्याने निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटले. अशात ईश्वरचिठ्ठीने सभापतींची निवड करण्यात आली. या ईश्वरचिठ्ठीनेच भाजपचा घात केला.नगर परिषद स्थायी समिती व सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि.१६) सभापतीपदासाठी निवडणूक नगर परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या निवडणुकीत पाचही विषय समित्या गठीत करण्यात आल्या. ११ सदस्यांची एक समिती या नुसार समित्या गठीत करण्यात आल्या. यात भाजप- ५, कॉंग्रेस-२, राष्ट्रवादी कॉंग्रेस- २ व नगर विकास आघाडी-२ अशी ११ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदासाठी भाजपचे धर्मेश अग्रवाल तर कॉंग्रेसचे शकील मंसूरी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतीक कार्य समितीसाठी भाजपच्या आशालता चौधरी व नगर विकास आघाडीच्या गौशिया शेख, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीसाठी भाजपचे दीपक बोबडे तर कॉंग्रेसचे क्रांती जायस्वाल,नियोजन व विकास समितीसाठी भाजपच्या रत्नमाला शाहू तर आघाडीच्या ज्योत्सना मेश्राम आणि महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजपच्या विमल मानकर तर कॉंग्रेसच्या निर्मला मिश्रा यांनी अर्ज सादर केले होते.या निवडणुकीत नगर विकास आघाडी व कॉंग्रेस एकत्र आल्याने भाजपच्या उमेदवारांना पाच तर आघाडीच्या (कॉंग्रेस व नगर विकास आघाडी) उमेदवारांना चार मते पडल्याने शिक्षण समिती सभापतीपदी भाजपच्या आशालता चौधरी, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी भाजपचे दीपक बोबडे, नियोजन समिती सभापतीपदी भाजपच्या रत्नमाला शाहू तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या विमल मानकर विजयी झाल्या. बांधकाम समिती सभापतीपदासाठी भाजप व आघाडीकडून समान ५-५ मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. नेमका येथेच घात झाला. आघाडीचे उमेदवार शकील मंसूरी यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली.सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी घडलेल्या घडामोंडीमुळे भारतीय जनता पक्षाचे नगर परिषदेतील पूर्ण सत्तेचे स्वप्न भंगले. नगर परिषदेत सर्वाधीक महत्वाचे सभापतीपद बांधकाम समितीकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे, या खुर्चीवर सर्वांच्या नजरा असतात. त्यासाठीच साम,दाम,दंड व भेद या चारही तत्वांचा वापर केला जातो. नेमके तेच सभापतीपद भाजपच्या हातून निसटल्याने भाजपच्या गोटात चांगलीच नाराजी दिसून आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी भाग घेतला नाही. यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला आपला पाठींबा दिला असे नगर परिषदेत बोलले जात होते.असा झाला खेळविषय समित्यांमध्ये भाजप- ५, कॉंग्रेस- २, राष्ट्रवादी- २ व नगर विकास आघाडी- २ सदस्य असे एकूण ११ सदस्य आहेत. यातील नगर परिषद बांधकाम समिती व पाणी पुरवठा समितीत सदस्य म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजय रगडे व अन्य एका सदस्याचे नाव होते. सभागृहात बांधकाम समिती व पाणी पुरवठा समिती सभापतीपदासाठी निवडणूक सुरू होताच रगडे सभागृहात पोहचले. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनात हात उंचावून मत दिले. यामुळे बांधकाम समितीसाठी धर्मेश अग्रवाल यांना भाजपचे ५ तर शकील मंसूरी यांना कॉंग्रेस- २, आघाडी-२ व राष्ट्रवादीचे रगडे यांचा एक असे एकूण ५ मत पडले. हाच प्रकार पाणी पुरवठा सभापतीपदासाठी घडला. त्यात भाजपचे दीपक बोबडे व कॉंग्रेसचे क्रांती जायस्वाल यांना ५-५ मते पडली. यामुळे दोन्ही पदांसाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात बांधकाम समितीसाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी चिठ्ठी काढली त्यात शकील मंसूरी यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने बांधकाम समिती सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली. तर पाणी पुरवठा समितीसाठी जितेंद्र पंचबुद्धे यांनी चिठ्ठी काढली व त्यात दीपक बोबडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली.
न.प.सभापती निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने केला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:03 AM
भारतीय जनता पक्षाचे नगर परिषदेतील पूर्ण सत्तेचे स्वप्न यंदा फिस्टकले. सर्वांच्या पसंतीचे बांधकाम समिती सभापतीपद भाजपच्या हातून निसटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य विजय रगडे यांनी ऐनवेळी आघाडीला (कॉंग्रेस व नगर विकास आघाडी) मत दिल्याने निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटले.
ठळक मुद्देएक कॉंग्रेस व चार भाजपचे सभापती : बांधकाम सभापतीपद हातून गेले