जागतिक पर्यावरण दिन लोकमत न्यूज नेटवर्क नवेगावबांध : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव विभाग, नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील अरण्यवाचन सभागृहात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त जलाशयाच्या काठावर असलेल्या बेशरम या वनस्पतींचे राजींचा टोक येथे निर्मुलन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर होेते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उप विभागीय वन अधिकारी गीता पवार, सहायक वन संरक्षक श्रीकांत पवार, नवेगाव अभयारण्याचे पाटील उपस्थित होते. जलाशयाच्या काठावर मोठ्या प्रमाणात बेशरम वनस्पतीचे साम्राज्य विस्तारत असल्याने तेथील पक्षी, सरपटणारे प्राणी आणि जलचर प्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्याने त्या परिसरातील जैव विविधता नष्ट होत आहे. जैव विविधतेचा प्रजनन क्षमतेवर परिणाम पडून दिवसेंदिवस जलचर प्राण्यांची संख्या कमी होत आहे. भविष्यात या वनस्पतीची वाढ झाल्यास याचा धोका प्राण्यांनाच नव्हे तर मानवाला सुद्धा होणार आहे. त्यामुळे याची दखल घेत वन विभागाने पर्यावरण दिनाचे निमित्त साधून बेशरम वनस्पती निर्मुलनाचा संकल्प घेऊन पर्यावरण दिन सादरा केला. कार्यक्रमाला हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रूपेश निंबार्ते, सृष्टी फाऊंडेशनचे अध्यक्ष शेषराव हत्तीमारे, ग्राम विकास परिस्थितीकी पांढरवानी, झोलेटोला, डोमाकोरेटोला, कोलारगाव, बकी, रामपुरी, येलोडीचे सदस्य तसेच विभागाचे वनकर्मचारी अशा प्रकारे सुमारे २०० हून व्यक्तींची उपस्थिती होती.
जलाशयाच्या काठावरील बेशरम वनस्पतींचे निर्मूलन
By admin | Published: June 08, 2017 2:11 AM