गोंदिया : गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून शिवरायांच्या संस्कृतीचा जागर करावा असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.तालुक्यातील ग्राम बिरसी येथे कुणबी समाजाच्यावतीने स्थापीत करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर चव्हाण, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तूरकर, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र भोतमांगे, कृष्णा ढाले, अखिल कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजा तिजारे, रामकृष्ण गुबरे पाटील, गज्जू फुं डे, विमानतळ निदेशक सचीन खंगार, संदीप पिंपळापुरे उपस्थित होते.पुढे बोलताना फुके यांनी, बिरसी येथील अनेक समस्यांना घेऊन लवकरच जिल्हाधिकाºयांशी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तर अग्रवाल यांनी, तत्कालीन सरकारने बिरसी विमानतळ प्राधीकरणसाठी जागा अधिगृहीत केली होत त्याचा बाजार भाव तय करून भरपाई देण्यात आली आहे. मात्र या रकमेला वर्तमान दराच्या आधारावर दुप्पट करण्यासाठी ते राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगीतले.याप्रसंगी रजनी नागपूरे, टिकाराम भाजीपाले, तुकड्याबाबा खरकाटे, केशोराव तावाडे, सुरजलाल खोटेले, प्रकाश सेवतकर, रामप्रसादसिंह पंडेले, ज्ञानचंद जमईवार, उत्तमसिंह चव्हाण, भैयासिंह खोहरे, खन हरिणखेडे, डेलेंद्र हरिणखेडे, विनायक राखडे, महेश सहारे, धनिराम तावाडे, रमेश कोरे, संजय महारवाडे, नरेश चौधरी, भाऊलाल तरोणे, शशेंद्र भगत, डुडेश्वर भूते, कमल येरणे, परसराम हुमे, राधेश्याम गजभिये, तिरथ येटरे, बहादूरसिंह मुंडेले, मिरा तावाडे, नारायण वंजारी, फगूसिंह मुंडेले, रामप्रसादसिंह पंडेले व मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.
छत्रपतींच्या आदर्शांना आत्मसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 9:29 PM
गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून....
ठळक मुद्देपरिणय फुके : ग्राम बिरसी येथे छत्रपतींच्या पुतळ््याचे अनावरण लोकमत न्यूज नेटवर्क