लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत कार्यरत सर्व रोजंदारी कर्मचारी हे शहर आणि समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. नगर परिषद चालविण्यात त्यांचे देखील विशेष योगदान आहे. अनेक रोजंदारी कर्मचारी स्थायी होण्याच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले. रोजंदारी कर्मचाºयांच्या पाठीशी आपण सदैव सक्षमपणे असून त्यांना आवश्यक ते सहकार्य करु, अशी ग्वाही आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.गोंदिया नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीतर्फे रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार गोपालदास अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी समितीचे उपाध्यक्ष नरेंद्र तिवारीे, कार्याध्यक्ष दिलीप चाचिरे, राजेश शर्मा, महासचिव राजेश टेंभुर्णे, कोषाध्यक्ष जितेंद्र वैष्णव, गणेश भेलावे, सहसचिव किशोर वर्मा, किशोर उके, अतुल हुद्दार, योगेश वर्मा, सुनील घोडमारे, राजेश राणा, वसंत वैद्य, दिगंबर पाटील, रंजित कनोजे, प्रभुदास भिवगडे, बेनिराम सोनवाने, पुरुषोत्तम रहांगडाले, समित्रा कुमार, राजु लिल्हारे, बुधराम निमजे, उमेंद्र दीप, सुनिता श्रीवास, सीमा रहांगडाले, गजेंद्र बन्सोड, राजेश जांभुळकर, नईम शेख, शरद चौरसिया, कंचन रगडे, अमृतलाल जोशी, सुभाष देशमुख, विजय जोशी, उत्तम गडपायले, अमृतलाल जोशी, योगेशकुमार वर्मा, कोमल बावनकर उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, न.प.कार्यरत रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्यासाठी आणि त्यांच्या वेतनात वाढ करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शासनाकडे आपण पाठपुरावा केला.त्याचेच फलित म्हणून शासनाने रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्याचा निर्णय घेतला. न.प.च्या सर्व कर्मचाºयांनी एकत्र येऊन कार्य करावे. तसेच शहराला स्वच्छ सुंदर करुन शहराच्या विकासाला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.सुरेंद्र बन्सोड म्हणाले, आ. अग्रवाल यांनी नेहमी रोजंदारी कर्मचाºयांना सहकार्य केले. न.प. मध्ये कुणाचीही सत्ता असली तरी त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विकासाला प्राधान्य दिले. रोजंदारी कर्मचाºयांना किमान वेतन त्यांच्याच प्रयत्नामुळे मिळाल्याचे सांगितले.रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जहिरभाई अहमद यांच्यासह सर्वांचे आभार मानले.
कर्मचारी हा महत्त्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 8:55 PM
नगर परिषदेत कार्यरत सर्व रोजंदारी कर्मचारी हे शहर आणि समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. नगर परिषद चालविण्यात त्यांचे देखील विशेष योगदान आहे. अनेक रोजंदारी कर्मचारी स्थायी होण्याच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : न.प. कर्मचारी संघर्ष समितीचा सत्कार कार्यक्रम