शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

कर्मचारी परतले कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:29 PM

नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाºयांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देमागण्यांच्या पूर्तीचे अवर सचिवांकडून आश्वासन : कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले. सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन मागे घेण्यात आल्याने बुधवारी (दि.२) नगर परिषद कर्मचारी कामावर परतले.शासनाने अधिकारी वर्गाला सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र नगर परिषद कर्मचाºयांना त्यापासून दूर ठेवण्यात आले. शासनाच्या या धोरणामुळे नगर परिषद कर्मचाºयांत चांगलाच रोष व्याप आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य नगर परिषद- नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने नव वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे अवघ्या राज्यातीलच नगर परिषद- नगर पंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले व नगर परिषद-नगर पंचायतींचा संपूर्ण कामकाज ठप्प पडला होता.नगर परिषद कर्मचाºयांच्या या आंदोलनाची दखल घेत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत नगर परिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालकांची बैठक संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थित मंगळवारी (दि.१) घेण्यात आली. बैठकीत नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून नगर परिषद कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी अपेक्षीत वित्तीय दायित्वाच्या माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर वेतन आयोग लागू करण्याबाबतच निर्णय घेण्यात येणार असे लेखी आश्वासन अव्वर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी दिले.अव्वर सचिवांच्या लेखी आश्वासनानंतर नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी (दि.१) तुर्त आंदोलन मागे घेतले. विशेष म्हणजे, अव्वर सचिवांच्या आश्वासनावर हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी मागण्यांची २ महिन्यांत पुर्तता न झाल्यास समिती पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.कामकाज सुरळीत सुरूसंघर्ष समितीच्या वरिष्ठांकडून मंगळवारी (दि.१) सायंकाळी बैठकीतील निर्णयाबाबत कळवून आंदोलन मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, जिल्ह्यातील नगर परिषद-नगर पंचायतींनी कामबंद आंदोलन मागे घेतले व बुधवारी (दि.२) सर्व कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे सोमवारी बंद पडून असलेले नगर परिषद- नगर पंचायतींचे कामकाज बुधवारी सुरळीत सुरू झाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका