शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:42 AM

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे ...

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही. नागरिक या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भर घालण्यात आली असली तरी हे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित

सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातीच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. याकरिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने वन्यजिवांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आहे.

विश्रामगृह तयार करण्याची मागणी

केशोरी : जिल्हा स्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.

दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब सहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.

सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था

तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.

नाल्यांवरचे अतिक्रमण काढा

गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत.

रस्त्याची दुर्दशा

मुंडीकोटा : येथून जवळ असलेल्या घोगरा ते पाटीलटोला (नवेगाव) या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. मात्र, अल्पावधीतच हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाटीलटोला येथे झांझरिया कंपनी आहे. त्यामुळे घोगरा येथील मजूर त्या कंपनीत कामावर जात असतात.