लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्यात भाजप सरकार सत्तारुढ असून देखील त्यांनी कामठा- पाजंरा येथील बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नाही. उलट आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मिळवून दिले. आमचे सरकार सत्तेवर आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करु, असे आश्वास मोदी सरकारने दिले होते. मात्र हे सरकार आल्यावर उलट रोजगार निर्मितीत घट झाली आहे. युवकांना रोजगाराच्या संधी केवळ काँग्रेसच्या काळात मिळू शकते. असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि. पा. पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील कंटगटोला, छिपिया, झिलमिली, लंबाटोला, पाजंरा, बिरसी, मोर्गरा, चारगाव, अर्जुनी येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, चुन्नाभाऊ बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, हेमराज देशकर, देवेंद्र मानकर, मिर्जा जीमल, टिकराम भाजीपाले, सत्यम बहेकार, विजय लोणारे, राजेंद्र मेंढे, डॉ. गिºहेपुंजे, हुुकुम नागपुरे, फागुसिंग मुंडले, केशव तावाडे, अनिल नागपुरे, संतोष घरसेले उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, भाजप नेते देश विदेशात देशाचा सन्मान वाढत असल्याचे सांगत आहे. ते स्वागताहार्य आहे. मात्र सरकारने दिलेल्या आश्वसनाची पुर्तता करुन त्यांचा सुध्दा सन्मान वाढण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे व २ कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता सरकारने केली नाही.त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी संबोधित केले.
युवकांना रोजगार केवळ काँग्रेसच्या काळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:30 PM
केंद्र व राज्यात भाजप सरकार सत्तारुढ असून देखील त्यांनी कामठा- पाजंरा येथील बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नाही. उलट आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मिळवून दिले.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कंटगटोला, छिपिया, झिलमिली येथे प्रचार सभा