शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्या

By admin | Published: July 12, 2017 2:20 AM

गोंदिया धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आता शेतकऱ्यांनी

राजकुमार बडोले : जिल्हा नियोजन समितीची सभा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आता शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळण्यासोबतच जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेतीला चालना द्यावी. यासाठी यंत्रणांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सोमवारी (दि.१०) अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस. युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे प्रमुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, विविध यंत्रणांना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देण्यात असून हा निधी योग्य नियोजनातून निर्धारित वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. निधी समर्पित करण्याची वेळ यंत्रणांना येणार नाही याकडेही लक्ष दयावे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता ३१ जुलै पुर्वी भरण्यास प्रोत्साहित करावे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ३६ रिक्त पदे भरण्याची कार्यवाही बिंदू नियमावलीनुसार एका महिन्याच्या आत करावी. जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज जोडणी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील ज्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत असे सांगून नामदार बडोले यांनी, जिल्ह्यातील पोंगेझरा, धम्मगिरी व कामठा या तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा मिळावा यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्यातील चिचगड, पालांदूर, बघोली, लटोरी, कहाली, गोरेगाव व इतर अपुर्ण अवस्थेतील पाणीपुरवठा योजना तातडीने सुरु कराव्यात. तसेच ज्या ठिकाणी निकषानुसार राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची आवश्कता आहे त्याठिकाणी बँक शाखा सुरु व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून पाठपुरावा करावा असे सांगीतले.तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी १६ स्लाईडची सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्याची कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या वृध्द, अपंग व गर्भवती महिलांना ये-जा करण्यासाठी लिफ्ट बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी ्असे सांगीतले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, कोल्हापूर बंधारे, जिल्ह्यातील अंगणवाडी दुरु स्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षासाठी वातानुकूलित यंत्र व जिल्हा परिषदेला लिफ्ट बसविण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करु न दयावी, अशी मागणी केली. आमदार अग्रवाल यांनी, आरोग्य विभागातील रिक्त पदे बिंदू नामावलीनुसार भरण्याची कार्यवाही, कामठा आश्रमाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा पुन्हा दयावा, कमी करण्यात आलेला आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा निधी गोंदिया व तिरोडा मतदार संघासाठी वाढवून दयावा, वैद्यकीय महाविद्यालयासाठी नविन सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार रहांगडाले यांनी, जिल्ह्यातील तालुका क्र ीडा संकुलाची तातडीने दुरु स्ती करु न संकुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. आमदार पुराम यांनी कचारगड ते हाजराफॉल या ५ किमी. अंतराच्या रोपवेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या ककोडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात यावी. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय टाळता येईल असे सांगीतले. जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ या वर्षात अनेक विभागाच्या तांत्रिक मान्यता उशिरा प्राप्त झाल्यामुळे निधी अखर्चीत राहिला तर यावर्षी योग्य नियोजनातून सर्व यंत्रणांचा निधी निर्धारित वेळेपूर्वीच खर्च करणार असल्याचे सांगितले. जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ या वर्षात सर्वसाधारण योजनेवर ९७.७८ टक्के, अनुसूचित जाती उपयोजनेवर ९९.९९ टक्के, आदिवासी उपयोजनेवर ९८.३ टक्के आणि आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर ९७ टक्के खर्च झाला आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात जून अखेर अनुसूचित जाती उपयोजनेवर २.५८ टक्के, आदिवासी उपयोजनेवर ५४.३२ टक्के, आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर ५८.३० टक्के, तर सर्वसाधारण योजनेवर खर्च निरंक असून असा एकूण ४२.७४ टक्के खर्च झाला आहे. खर्चाची टक्केवारी १२.२५ टक्के इतकी असल्याचे सांगीतले. संचालन करून आभार मृणालिनी भूत यांनी मानले. पाहुण्यांचे सेंद्रिय तांदळाची पिशवी देऊन स्वागत यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविता यावी यासाठी यापुढे कार्यक्र मानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ व पुष्पहार न देता सेंद्रीय तांदळाची पिशवी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून उपस्थित सर्व मान्यवरांना तांदळाची पिशवी भेट म्हणून दिली. राज्य सरकारला सुध्दा त्यांनी अशाच प्रकारचा प्रस्ताव पाठवून विविध कार्यक्र मानिमित्त येणाऱ्या मान्यवरांना स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ न देता सेंद्रीय तांदूळ असलेली १ किलोची पिशवी भेट म्हणून दयावी त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळेल असे सूचिवले आहे. पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्यांना अनुदान कार्यक्रमात पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्या सालेकसा तालुक्यातील मोहाटोला येथील अनिता माहुले, रामाटोला येथील प्रेमलाल चौरके, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथील राजकुमार मानापूरे, चोपराम आरसोडे, विनोद कापगते, पुष्पा तिरपुडे, दुर्गा हातझाडे, तिडका येथील पुरु षोत्तम कापगते, कौशल्या उके, देवराम मडावी व इब्राहिम पठाण या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आंबा, चिंच या वृक्षांचे संवर्धन करीत असल्याबद्दल एक हजार व दोन हजार रु पयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.