शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Published: July 14, 2017 1:09 AM

तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत होती.

मटन-चिकनच्या दुकानांना बंदी : नागरिकांनी केली होती आयुक्ताकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत होती. या मार्केटला स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात यावे, यासाठी नागरिकांनी लढा उभारला होता. लोकमतमध्ये नागरिकांच्या या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सर्व बाबींची दखल घेऊन बनगाव ग्रामपंचायत व बाजार समितीने या दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.आमगाव येथील बाजार समितीच्या हद्दीत बनगाव रस्ते परिसरात कोंबडी व मटन व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत.या दुकानांच्या उघड्या वेस्टेजमुळे नागरिकांना रहदारीला आळा बसला होता. तर दुकानात कापलेल्या मटन-चिकनचे वेस्टेज लोकवस्तीत पसरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.बाजारपेठमधील मटन व चिकनची दुकाने अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत यांना निवेदन दिले होते. नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने ग्रामपंचायत व बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमणात असलेले कोंबडी व मटन मार्केट हटाव मोहीम गुरुवारी (दि.१३) सुरू केली. यावेळी तणाव निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक एस. दासुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार केशवराव मानकर, उपसभापती रविदत्त अग्रवाल, सरपंच सुषमा भुजाडे यांनी समन्वयाची भूमिका घेत अतिक्रमणीत दुकान चालकांना स्वमर्जीने दुकाने हलविण्याचे निर्देश दिले. या वेळी अनेक दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले. यावेळी अस्वच्छता व नागरिक वस्तीच्या तक्रारीची दखल व्हावी यासाठी बाजार समितीचे सचिव सुभाष चव्हाण यांनी शासनाचे दिशानिर्देश समजावून सांगितले. याप्रसंगी पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या समन्वयाने अतिक्रमण मोहीम पूर्ण करण्यात आली.