लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे पात्र आहेत त्यांनी प्राप्त अनुदान लक्षात घेऊन घरकुलाचे बांधकाम वेळेच्या आत करावे. गावातील कोणतीही गरजू व्यक्ती निवाऱ्या अभावी दैनंदिन जीवन जगू शकत नाही. अशा गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी केले.येथील ग्रामपंचायतच्यावतीने आवास सप्ताह निमित्त सार्वजनिक रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता सी.एस.चौधरी, उपसरपंच वैशाली मानकर, ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, ग्रामविकास अधिकारी पी.एम.समरीत प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना आंदेलवाड यांनी, आर्थिक गणना २०११ च्या सर्वेनुसार आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी बनविण्यात आली. गावच्या ग्रामसभेत प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार टप्याटप्याने घरकुलाचे उद्दिष्ट येत असल्याने पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया केली जात आहे. घरकुलाचे मिळणारे अनुदान पाहून व स्वत:ची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन घरकुल निर्मिती करावी. आपल्या हक्काच्या घरात राहण्याचा एक वेगळा आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले.याप्रसंगी घरकुल बांधकाम पूर्ण करुन वास्तव्याने राहत असलेले मनोहर नंदागवळी, सुमन मेश्राम, दुलीचंद ठवरे, तुरजा मेश्राम, रामु सोनवाने, रसिका खोब्रागडे यांना प्रशस्त्रीपत्र व पुष्पगुच्छ देऊन आंदेलवाड यांनी गौरविले.यावेळी ठवरे यांनी, लाभार्थ्यांना वेळेच्या आत घराचे बांधकाम पूर्ण करा. तसेच विधवा महिला व अत्यंत गरजू आहेत अशांना सर्वप्रथम घरकुलांचा लाभ द्यावा अशी मागणी केली. अभियंता चौधरी यांनी अनुदान मिळण्याचे टप्पे सांगीतले. संचालन करुन आभार ग्रामविकास अधिकारी पी.एम.राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी राष्ट्रपाल ठवरे, किशोर शहारे, दिपक तिवातले, मनोज पालीवाल, गूड्डू मेश्राम यांनी सहकार्य केले.
हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:00 AM
गावातील कोणतीही गरजू व्यक्ती निवाऱ्या अभावी दैनंदिन जीवन जगू शकत नाही. अशा गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी केले.
ठळक मुद्देमयूर आंदेलवाड : प्रधामंत्री आवास योजना, लाभार्थ्यांचा गौरव