येथील नमाद महाविद्यालय व धोटे बंधू महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून, त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. ‘झाडे लावा- झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे. आज प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी रहांगडाले, केतन तुरकर, कान्हा बघेले, जागृत सेलोकर, समीर गडपायले, ओम ठाकरे, चाहत मेश्राम, आकाश नागपुरे, लव माटे, विशाल शेंडे अन्य उपस्थित होते.
देशासोबतच या पर्यावरणाचेसुद्धा देणे लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:19 AM