कोविड प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी १९ मे रोजी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्विनी कदम, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिवांचे प्रतिनिधी ए. एम.गजापुरे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष संगीता घोष, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक विशाल मेश्राम, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) मुकेश पटले, माहिती विश्लेषक पुनेश नाकाडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मीना म्हणाले, कोविड आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे तसेच बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळूवन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी द्यावी याकरीता जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयामध्ये मदतीकरीता चाईल्ड हेल्प लाईन १०९८ हा संपर्क क्रमांक दर्शनीभागात लावावे. बालकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
.....
जिल्ह्यात निरीक्षण व बालगृह तयार स्थापन करणार
जिल्ह्यात बालसंरक्षण गृह नाही त्यामुळे जवळच्या जिल्ह्यात बालकांना बाल संरक्षणगृहात पाठविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यात निरीक्षण गृह व बालगृह तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले.
कोविड आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे तसेच बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळूवन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी द्यावी याकरीता जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयामध्ये मदतीकरीता चाईल्ड हेल्पलाईन १०९८ हा संपर्क क्रमांक दर्शनीभागात लावण्यात येणार आहे.