लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.पान लाईनमधील दुकांनाना सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाणी आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागल्याची माहिती आहे. गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार वाहनाना वांरवार पाणी भरुन आणण्यासाठी गणेशनगर येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालय परिसरात जावे लागले.आग आटोक्यात आणण्यासाठी या चार वाहनानी २३ फेºया मारल्या. मात्र यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील अरुंद रस्ते आणि गल्यांमुळे चांगलीच अडचण झाली आहे. विशेष म्हणजे अग्नीशमन वाहनांच्या सोयीसाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी अग्नीशमन विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडण्याचा निर्णय घेतल्याने अग्नीशमन वाहनांमध्ये वेळीच पाणी भरुन आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. तर शहरातील अतिक्रमणाची समस्या अद्यापही कायम असल्याने अग्नीशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यास मोठी अडचण जाते.ही आजची समस्या नसून बºयाच वर्षांपासूनची आहे. शहरात वांरवार आगीच्या घटना घडल्यानंतर सुध्दा नगर परिषदेकडून यावर उपाय योजना केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पान लाईनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विविध व्हॉटसअप ग्रुपवर सुध्दा बिंदलच्या घटनेनंतरही नगर परिषदेने धडा घेतला नसल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी नगर परिषदेवर रोष व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा अभावनगर परिषदेच्या अग्नीशमन विभागात अद्यापही कर्मचाºयांची अनेक रिक्त पदे रिक्त आहेत. तर अजुनही जुन्याच वाहनाच्या भरोश्यावर या विभागाचा कारभार सुरू आहे. सध्या अग्नीशमन विभागात २८ कर्मचारी कार्यरत असून ते तीन पाळीत सेवा देत आहेत. एका पाळीत केवळ ९ कर्मचारी कार्यरत असतात. यामध्ये वाहन चालकाचा देखील समावेश असून चार वाहने एकाच वेळी गेल्यास केवळ पाच कर्मचाºयांच्या मदतीने आगीच्या घटनावर नियंत्रण मिळविण्यास मोठी अडचण जाते.फायर स्टेशनची प्रतीक्षागोंदिया नगर परिषदेला दुसऱ्या फायर स्टेशनसाठी रेलटोली परिसरात जागा निश्चित करण्यात आली. मात्र मागील १० वर्षांपासून फायर स्टेशनचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे फायर स्टेशनसाठी पुन्हा किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.मजीप्राचा पाणी देण्यास नकारआगीच्या घटनावर वेळीच नियंत्रण मिळविता यावे. यासाठी अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधिकारी सी.एल.पटले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. मात्र मजीप्राच्या अधिकाºयांनी पाणी उपलब्ध करुन देण्यास नकार दिला. त्यामुळे अग्नीशमन विभागाला पान लाईनमधील दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
त्या घटनेनंतरही धडा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 9:25 PM
शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देअग्नीशमन विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव : सोशल मीडियावर रोष