गोंदिया : काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करणे यालाच ‘लाचखोरी’ म्हटले जात असले तरी, ही आजच्या काळातील एक प्रथाच झाली आहे. यामुळेच आता लाचखोरांना आता काळ-वेळेचे गांभीर्य उरले नसून, कोरोना महामारीच्या या कठीण समयीही ते काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करीत आहेत. अशात मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन २०१८ ते आतापर्यंत सन २०२१ मध्ये एकूण ६९ कारवायांत ८७ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोरोना महामारीने चांगलाच कहर केला असून, यामुळे कित्येकांचा जीव गेला आहे. गंभीर बाब म्हणजे, कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले आहे. कसे तरी, कोठून तरी व काही तरी कामधंदा करून मेहनत करीत ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. आजची परिस्थिती एकमेकांना सहकार्य करण्याची असताना, मात्र आजही कित्येक अशी माणसे आहेत, ज्यांना पैसाच सर्व काही असून कुणाचेही काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करतात. यात शासकीय नोकरीवर असलेला वर्ग जास्त असून, कोरोना महामारीच्या काळातही ते लाचखोरी करीत आहेत.
---------------------------
कोरोनाकाळात ‘ग्रामविकास’ विभागाची वरकमाई जोरात
-----
--------------------------------
२०१८ - २५
२०१९- २२
२०२०- १६
---------------------------------
कोरोना महामारीच्या काळातही लाचखोरांनी पैशांची मागणी केली असून सन २०२० व २१ मध्ये लाचखोरीविरुद्ध २२ कारवाया आम्ही केल्या आहेत. यातून पैशांचा हव्यास असलेल्यांना काळ व वेळेचे काहीच घेणे-देणे दिसत नाही. मात्र काम करून देण्यासाठी कुणीही पैशांची मागणी केल्यास त्यांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
- रमाकांत कोकाटे
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया.