लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही. मग शाळा शंभर टक्के डिजीटल कशा झाल्या असा प्रश्न सुज्ञ नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या डिजीटल संकल्पनेला साथ देत शिक्षण विभागाने डिजीटलची कास धरली. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असताना शिक्षण विभागाने शाळांना डिजीटल शिक्षणाचा डोज दिला.जि.प.शिक्षण विभागाने उचलेले हे शैक्षणिक पाऊल कौतुकास्पद होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये डिजीटल स्क्रीन आणि साहित्य उपलब्ध करुन दिले. फळ्यावर खडूने लिहून शिकविण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्क्रीन बोर्डवर शिकविण्यास सुरूवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यास मदत झाली. सध्या सगळीकडे डिजीटलचा बोलबाला आहे. त्यात काही गैर नाही. मात्र गोंदिया जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के डिजीटल झाल्याचा मोठा गाजावाजा केला होता. याच विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले. यापेक्षा धक्कादायक म्हणजे गावखेड्यांपर्यंत वीज पोहचली असताना जि.प.च्या २१ शाळांमध्ये अद्यापही वीज पोहचली नसल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा डिजीटल कश्या झाल्या. एकाहीे शाळेमध्ये जनरेटरची व्यवस्था नाही मग विद्यार्थ्यांना डिजीटल स्क्रीनवर धडे कसे दिले जात आहे. असा प्रश्न सुज्ञ नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. तर सर्व शिक्षा अभियानातील अधिकाºयांनी सप्टेबरपर्यंत १७३ शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत होता असे सांगितले. पण सध्या स्थितीत या शाळांचा वीज पुरवठा सुरळीत झाला अथवा नाही याची माहिती अपडेट नसल्याचे सांगितले.डिजिटलची पडताळणी करणार कोणजि.प.शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला. मात्र ज्या शाळांमध्ये वीजच नाही तिथे विद्यार्थ्यांना डिजीटलचे धडे कसे दिले जात आहे. संगणकांची काय स्थिती आहे. याची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी शाळेला भेट देऊन पडताळणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वीज पुरवठा खंडीत तरी शाळा शंभर टक्के डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:29 PM
तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही.
ठळक मुद्दे२१ शाळांमध्ये वीजच नाही : जि.प.शिक्षण विभागाचा कारभार