गोंदिया : प्रत्येक पदार्थावर बेस्ट बिफोर लिहिणे अत्यावश्यक आहे. गोंदियातील दुकानदारांनी आपल्या दुकानात स्वच्छता राखावी, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, जेवण किंवा खाद्यपदार्थासंबंधी अत्यंत काळजी घ्यावी, शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत; अन्यथा कारवाईला सामोर जावे लागेल, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ए.पी. देशपांडे यांनी दिले आहेत. गोंदियाच्या एका हॉटेलात आयोजित मिष्ठान्न दुकानदारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अन्न निरीक्षक एस.एस. देशपांडे, एम.पी. चहांदे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मिठाई दुकानदार सुधीर गुप्ता, टिहूलाल लिल्हारे, अनुराग अग्रवाल, सोनू नागदेवे, परसलाल बसिने, खेमलाल राऊत, राजेश शिवलानी, कपिल पुरोहित, राधे पुरोहित, गिरधरभाई हलानी, राहुल बोस, देवीसिंग राजपुरोहित, पर्वतसिंग राजपुरोहित, गौतमसिंग राजपुरोहित व इतर मिष्ठान्न दुकानदार उपस्थित होते.
प्रत्येक पदार्थावर असावा बेस्ट बिफोर- देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:30 AM