सुषमा अंधारे : रमाई व बाबासाहेबांचा जयंती उत्सव थाटातगोंदिया : माता रमाईने बाबासाहेबांसाठी त्याग केला नसता तर बाबासाहेब जगातील विद्वान पुरूष बनले नसते. अशात भारताचा संविधान नसता व शोषीत पिडीत बहुजनांना कधीही न्याय मिळाला नसता. त्यांच्या या लढ्यात माता रमाईंचे तेवढेच योगदान होते. त्याचप्रकारे सामाजिक कुरीतींनी भरलेल्या परंपरेच्या विरोधात लढणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत डॉ.सुषमा अंधारे यांनी केले. लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्यावतीने डब्लिंग ग्राऊंड येथे बुधवारी आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन माजी आमदार दिलीप बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भंते संघधातू होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, लॉर्ड बुद्धा टिव्ही चॅनेलचे संचालक भय्यासाहेब खैरकर, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगर परिषद सदस्य शिव शर्मा, चॅनेलचे संचालक सचिन मून, राजू मून, निरज कटकवार, विजय बहेकार, किसनसिंग बैस, संजय ओक्टे, अतूल वासनीक, चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी रतन वासनीक, सुनील आवळे, मेहताब खान, अशोक बेलेकर, भाऊराव नागमोती उपस्थित होते. याप्रसंगी नामदार बडोले यांनी, बाबासाहेबांचे लंडन येथील घर, भिमा कोरेगाव येथील १३ एकर जागा, मुंबईच्या इंदूमीलची १२ एकर जागा, दिक्षा भूमीला ५०० कोटी रूपये मंजूर, अलिपूर येथील बाबासाहेबांच्या घराला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून १२० कोटी रूपये खर्च त्याला विकसीत करणे यासह अन्य कार्य करून मी स्वत:ला गौरवांवीत समजत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात ४० दानदाता व समाजसेवकांच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन ज्योती भगत यांनी केले. कार्यक्रमासाठी लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे विनोद जांभूळकर, रंजीत बंसोड, प्रफुल भालेराव, राजेश भोयर, सेवक बंसोड, ललिता बोंबार्डे, मिरा चिंचखेडे, कैलाश गजभिये, राहूल वालदे, रितू वासनीक, अक्षय वासनीक, धनद्रव उके, अनिल मेश्राम, प्रदीप शहारे, जितेंद्र डोंगरे, धर्मपाल शहारे आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
समाजातील कुरीतींविरोधात लढणे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य
By admin | Published: February 14, 2016 1:39 AM