गोंदिया : कोरोनाने अवघ्या देशाला हेलावून सोडले आहे. तरीही कोरोना योद्धे आपला जीव पणाला लावून काम करीत आहेत. आज तंत्रज्ञानाच्या शिखरावर देश अग्रेसर आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. करिता देशाच्या नवनिर्माण करण्याकरिता सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून विचार करावा असे प्रतिपादन डी.बी.एम.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुद्धे यांनी केले.
डी.बी.एम. शिक्षण संस्थाव्दारा संचालित गोंदिया पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून .डॉ. अमित बुद्धे, प्राचार्य जीतेंद्र तलरेजा, उपप्राचार्य रीता अग्रवाल, हायस्कूल विभाग प्रमुख महेश गौर, माध्यमिक विभाग प्रमुख शेखर बिधानी, प्रि-प्रायमरी व प्रायमरी विभाग प्रमुख ज्योती जगदाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अर्जुन बुद्धे व डॉ. अमित बुद्धे यांच्या हस्ते भारत माता व महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून राष्ट्रध्वजाला सलामी देत करण्यात आली. याप्रसंगी रोशनी पांडे व शिक्षिका सरिता कुथे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर विद्यार्थ्यांनी नृत्य व वेशभूषा सादर केली. दरम्यान, शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संचालन गुणवंता पारधी यांनी केले. आभार रमा पांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.