शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

समाजऋण फेडणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:24 PM

बाबासाहेबांमुळेच मी मंत्रिपदावर पोहोचलो. त्यांच्या विचारांमध्ये विकास घडविण्याचे सामर्थ्य आहे. समाजातील शोषित-पीडितांना समता, बंधुत्व व न्याय देण्याचे कार्य आम्ही आपल्या विभागाद्वारे करीत आहोत.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : महिलांना साडीचोळी वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाबासाहेबांमुळेच मी मंत्रिपदावर पोहोचलो. त्यांच्या विचारांमध्ये विकास घडविण्याचे सामर्थ्य आहे. समाजातील शोषित-पीडितांना समता, बंधुत्व व न्याय देण्याचे कार्य आम्ही आपल्या विभागाद्वारे करीत आहोत. समाजऋण फेडणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा गोंदियाच्या वतीने मामा चौक, सिव्हील लाईन्स येथे महिलांना साडीचोळी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ना. बडोले यांना भाजप अ.जा. मोर्चाद्वारे ‘कर्मवीर’ उपाधीने सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. अतिथी म्हणून भाजप जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष रतन वासनिक, भाजप युवा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी न.प. शिक्षण सभापती भावना कदम, मेहताभ खान, शीला चव्हाण, माजी पं.स. सभापती कविता रंगारी, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका, भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अमित बुद्धे, अहमद मनियार, प्रदीप सिंग, न.प. सदस्य अफसाना पठान उपस्थित होते.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, समता, बंधुत्व व न्यायासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे.कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अर्धा खर्च व्यसनांवर होत आहे. त्यामुळे घरच्या वातावरणात अशांती निर्माण होत आहे. शांती हवी असेल तर व्यसनांपासून दूर रहा. असे सांगून ते म्हणाले, कर्मवीरची उपाधी केवळ थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना मिळाली आहे. मी कर्मवीर उपाधीच्या योग्य नाही. मंत्रिपदावर राहून मला डॉ. आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावयाचे आहे, असे ते म्हणाले.आपल्या मार्गदर्शनात रतन वासनिक म्हणाले, मागील ५५ वर्षांच्या काळात अनेक नेत्यांनी केंद्र व राज्यात मंत्रिपद ग्रहण केले. मात्र समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी आंबेडकरी समाजाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो सन्मान दिला, तो आतापर्यंत कोणत्याही नेत्याने दिला नाही. त्यामुळे त्यांना कर्मवीर उपाधीने सन्मानित करण्यात येत असल्याचे सांगितले.या वेळी १०० महिलांना साडीचोळीचे वाटप व ५६ किलो बुंदीच्या लाडूंचे वाटप ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.कार्यक्रमासाठी महासचिव अजित मेश्राम, अक्षय वासनिक, जिल्हा महासचिव अशोक मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष श्याम चौरे, धनंजय वैद्य, वसंत महाजन, मुजीब पठान, सुधीर जांभूळकर, चंदू मेश्राम, जयेश परशुरामकर, राहुल कनोजिया, प्रदीप भरणे, रूद्रेश बेंद्रे, नयनित भालाधरे, अफजल पठान, लोकेश नागपुरे, युवा फ्रेन्ड्स ग्रुप व अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले