लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाला सुरूवात होताच काही केंद्रावरील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड आल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जवळपास ६५ मतदान केंद्रावरील मतदान दोन ते तीन तास ठप्प होते. ६५ पैकी ३४ मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीन सकाळी ११ वाजतानंतरही सुरू न झाल्याने या मतदान केंद्रावर मतदान थांबविण्याचे निर्देश गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी दिले. तर मशिन मधील बिघाड दुरूस्तीकरीता नियुक्त केलेल्या अभियंत्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.गोंदिया विधानसभा मतदार संघात एकूण ३४५ मतदान केंद्र व ३ लाख ७ हजार ४५३ मतदार आहेत. मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करुन मोकळे होण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र मतदानाला सुरूवात झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीममध्ये बिघाड आल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे काही मतदान केंद्रावरुन शेकडो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. तर निवडणूक विभागाने गोंदिया शहरातील १० मतदान केंद्रात एैनवेळी बदल केला. मात्र याची माहिती बऱ्याच मतदारांना नसल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गोंदिया विधानसभा मतदार संघातील ६५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड असल्याच्या लेखी तक्रारी उपविभागीय अधिकाºयांना प्राप्त झाल्या. त्यानंतर या तक्रारींची चाचपणी करुन उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविण्याचे आदेश काढले आहे.मतदरांना मनस्तापअर्जुनी व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेंडा, बोथली, खोडशिवणी, परसोडी, इटखेडा, शहारवाणी, कन्हारपाली या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया दीड ते दोन तास ठप्प होती. त्यामुळे मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.वातावरणाचा परिणामभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीटीपॅट मशीनचा वापर करण्यात आला. या व्हीव्हीटीपॅट मशीन गुजरात येथून मागविण्यात आल्या होता. तसेच तेथील तापमान गृहीत धरुन या मशीन तयार करण्यात आल्या होत्या. गुजरात आणि महाराष्ट्रातील तापमानात बराच फरक आहे. अधिक तापमानात व्हीव्हीटीपॅट मशिन काम करीत नसून त्या बंद पडत असल्याने निवडणूक विभागाच्या एका तांत्रिक अधिकाºयाने सांगितले. ही बाब माहिती असूनही याकडे दुर्लक्ष केले.कमी मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावरलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तिरोडा विधानसभा क्षेत्रात सकाळी वेळेवर मतदानास सुरुवात झाली. तर काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदान ठप्प झाले होते. त्याचाच परिणाम मतदानाच्या टक्केवारी झाला. मतदानाची कमी टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.तिरोडा येथील सी.जे.पटेल कॉलेज मधील बूथ, विहिरगाव, निमगाव (इंदोरा), मेंदिपूर, घोगरा, या ठिकाणी मशीन बंद पडून मतदान काही काळासाठी ठप्प झाले होते. काही ठिकाणी दुसरी मशीन उपलब्ध करुन तर काही ठिकाणी मशीन दुरुस्त करुन मतदान सुरळीत करण्यात आले. प्रशासनाने आपले तांत्रीक अधिकारी पाठवून दुरुस्ती करवून घेतल्या. काही ठिकाणी मात्र २ ते ३ तासापर्यंत मतदानात खंड पडला.ईव्हीएमच्या चाचपणीवर प्रश्न चिन्हभंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड आल्याच्या तक्रारी होत्या. काही केंद्रावरील ईव्हीएम केवळ बॅटरी डाऊन असल्यामुळे बंद पडल्या. त्यामुळे या ईव्हीएम मशिन केंद्रावर पाठविण्यापूर्वी केलेल्या तपासणीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.समन्वयाचा अभावमतदान प्रक्रियेदरम्यान अनेक केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान केंद्रावरील अधिकाºयांनी याची तक्रार वरिष्ठ अधिकाºयाकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे बुथवरील निवडणूक कर्मचाºयांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.पिंडकेपार मतदान केंद्रावर मशीन बंदसुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार मतदान केंद्र २१५ वर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. त्यानंतर सकाळी ८.५६ वाजताच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यानंतर वांरवार मशिनमध्ये बिघाड आल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. तर मतदारांना त्रास सहन करावा लागला. तर आलेझरी केंद्र क्रमांक २०९ येथे सुद्धा सकाळी १०.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत मशिन बंद होती, नंतर सुरू झाली.
ईव्हीएममध्ये बिघाड अन् अभियंत्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:38 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाला सुरूवात होताच काही केंद्रावरील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड आल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जवळपास ६५ मतदान केंद्रावरील मतदान दोन ते तीन तास ठप्प होते.
ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : सर्वच केंद्रावरुन तक्रारी, प्रशासनाचे ढिसाळ नियोजन