लोकमत न्यूज नेटवर्कखातिया : पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत सर्वच जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया तालुक्यातील खातिया-अर्जुनी-रावणवाडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. मात्र वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे रोपट्यांच्या सुरक्षीततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.शासनाच्या वतीने विविध योजनेतंर्गत पर्यावरण संतुलन साधण्यासाठी व्यापक स्वरुपात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. गोंदिया तालुक्यातील खातिया-अर्जुनी-रावणवाडी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. मात्र वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांभोवती लोखंडी कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे ही रोपटी जनावरे खाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने वृक्षारोपणासाठी लाखो रुपयांचा खर्च केला मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची मागणी केली जात आहे.
हजारो रोपट्यांचे अस्तित्व संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:30 PM
पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत सर्वच जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया तालुक्यातील खातिया-अर्जुनी-रावणवाडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.
ठळक मुद्देवृक्षारोपण करुन कठडे लावण्याचा पडला विसर