ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी चालणाऱ्या द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या परिचलनात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवाशांची सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने हटिया व पुणे दरम्यान २ मार्च २०१८ पर्यंत चालणाºया साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या परिचालनात २९ जून २०१८ पर्यंत विस्तार केला आहे. ही गाडी प्रत्येक बुधवारी हटियावरून पुणेसाठी ७ मार्च ते २७ जूनपर्यंत (०२८४६) या क्रमांकाने तसेच प्रत्येक शुक्रवारी पुणेवरून हटियासाठी ९ मार्च ते २९ जूनपर्यंत (०२८४५) या क्रमांकाने धावेल. सदर स्पेशल ट्रेनमध्ये दोन एलएसआर, चार सामान्य श्रेणी, सहा स्लीपर कोच, एक एसी-२, चार एसी-३ यासह एकूण १७ कोच राहतील.हटिया-पुणे (०२८४६) हटिया-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल हटियावरून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रात्री ९ वाजता सुटेल. तसेच गोंदिया स्थानकावर गुरूवारी सकाळी ९.१० वाजता पोहचेल. तर पुणे-हटिया (०२८४५) साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुणेवरून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता सुटेल. तसेच गोंदिया स्थानकावर शनिवारी पहाटे ४.०६ वाजता पोहचेल.सांतरागाछी-हापा समर स्पेशलउन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी व सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने सांतरागाछी व हापा दरम्यान एक साप्ताहिक एसी समर स्पेशल ट्रेन १३ फेरींसाठी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत सांतरागाछीवरून हापासाठी प्रत्येक शुक्रवारी (०२८३४) या क्रमांकाने व याचप्रकारे विपरित दिशेत प्रत्येक सोमवारी हापा ते सांतरागाछीसाठी ९ एप्रिल ते २ जुलैपर्यंत (०२८३३) क्रमांकाने धावेल. या ट्रेनमध्ये रेल्वे नियमांनुसार स्पेशल चार्ज लागेल. यात एसी-३ च्या १४ कोच व दोन पॉवरकारसह एकूण १६ कोच राहतील. सांतरागाछी-हापा (०२८३४) ही गाडी गोंदियाला शनिवारी दुपारी १२.५३ वाजता पोहोचेल. तर हापा-सांतरागाछी (०२८३३) ही गाडी गोंदियाला मंगळवारी दुपारी १२.४१ वाजता पोहचेल.
हटिया-पुणे ट्रेनच्या परिचालनात विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:06 AM