शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सरकारची अकार्यक्षमता उघड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:06 PM

जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका कॉंग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता भाजप सरकारचा खरा चेहरा उघड करावा. सरकारची अकार्यक्षमता जनतेपुढे उघडकीस आणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकजूट होऊन कामाला लागावे, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रताप लॉन येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले सन २००४ मध्ये कॉंग्रेस जेथे १०-१२ ग्रामपंचायतवर मर्यादित होता. तेथेचे आज कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ताकत मिळाली आहे. सुमारे ६५ ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचा झेडा फडकला आहे.जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस सत्ता असून पंचायत समितीवर मागील १५ वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. कार्यकर्त्यांची सततची मेहनत व मार्गदर्शनाचे हे फलीत आहे. आज आम्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या स्थितीत शेतकºयांच्या बाजूने गोंदियापासून मुंबई पर्यंत आवाज उठविला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सर्वप्रथम आम्ही परिस्थितीशी अवगत करवून दिले. आता आमच्या पाठोपाठ अन्य पक्ष या विषयावर आपली पोळी भाजत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता व शेतकरी सर्वांनाच कॉंग्रेसच्या धोरणांची जाणीव आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता पूर्ण जोर लावून ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाच्या नावावर पक्षाचा प्रचार करावा असे आमदार अग्रवाल म्हणाले.पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, कॉंग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन पुरूषांच्या बरोबरीचा दर्जा दिला. तेथेच भाजप सरकारने मात्र महिलांना दैनंदिन उपयोगात येणाºया वस्तूंचे भाव वाढवून त्यांच्या विश्वासावर आघात केला आहे. त्याचे उत्तर महिला ग्रामपंचायत निवडणुकीत देणार असल्याचे मत व्यक्त केले. संचालन तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, अशोक बाकलीवाल यांनी केले. आभार महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. मेळाव्याला जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे, बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, अरूण दुबे, कुर्मराज चव्हाण, भास्कर रहांगडाले, रमेश अंबुले, सीमा मडावी, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, शेखर पटले, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनीत मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, रमेश लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जून नागपूरे, जगदीश अग्रवाल, देवेंद्र मानकर, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, संतोष घरसेले, वाय.पी. रहांगडाले, महेंद्र बिसेन, सरोज मस्करे, जे.सी.तूरकर, ब्रिजलाल पटले, नामदेव सहारे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.