शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

एक्स्प्रेस गाड्या रुळावर, मात्र पॅसेंजरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 5:00 AM

लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४० गाड्या धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी नियमित ७५ हून अधिक गाड्या धावत होत्या. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, मागील दीड वर्षापासून अनेक रेल्वे गाड्या बंद आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांना बसतोय भुर्दंड : नव्या निर्बंधामुळे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर : पॅसेंजर गाड्या लवकर सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर रेल्वे विभागाने काही विशेष आणि एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत, पण मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची अडचण कायम आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४० गाड्या धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी नियमित ७५ हून अधिक गाड्या धावत होत्या. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, मागील दीड वर्षापासून अनेक रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसेस व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे विभागाने येत्या १ जुलैपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे १ जुलैपासून नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता कमी आहे.  

 पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे?- जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेटही १ टक्केच्या आतच आहे. बसेसही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.- पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्यास गर्दी वाढून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  n पॅसेंजर लोकल गाड्यांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर प्रवाशी करणार किंवा नाही याची शक्यता कमी आहे. n लसीकरणाचा टक्का ७५ टक्क्यांवर गेल्यानंतर बहुतेक रेल्वे गाड्या सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रवासी काय म्हणतात?

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, नागरिकही आता स्वत:ची काळजी घेत आहेत. रेल्वे विभागाने एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या असून, पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची गरज आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मदत हाेऊन आर्थिक भुर्दंड बसणार नाही. - दिलवर रामटेके, रेल्वे प्रवासी

लोकल आणि पॅसेंजर गाड्या मागील दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची अडचण आणि त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची गरज आहे. - प्रशांत मेश्राम, रेल्वे प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या