शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

कारच्या धडकेत गोरेगाव पं.स.चे विस्तारी अधिकारी ठार; गोंदिया-बालाघाट मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 11:18 AM

टिप्परला ओव्हरटेक करताना कारचा अपघात, जिल्हा परिषदेसमोरील घटना

गोंदिया : टिप्परला ओव्हरटेक करताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत गोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोंदिया-बालाघाट बायपास मार्गावरील जिल्हा परिषदेसमोर घडली. शशिकांत खोब्रागडे, रा. शिवनगर, सैनिक चौक, फुलचूर, गोंदिया, असे मृतक विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे, तर कार चालक जखमी झाला.

शशिकांत खोब्रागडे हे गोरेगाव पंचायत समिती शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते रा. शिवनगर, सैनिक चौक, फुलचूर, गोंदिया येथे राहतात. दररोज सायंकाळच्या सुमारास ते गोंदिया-बालाघाट मार्गावर पायी फिरायला जात हाेते. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते या मार्गावर फिरायला जात असताना कारने (एमएच ३५, एआर १३५०) एका टिप्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कार चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पायी जात असलेले शशिकांत खोब्रागडे यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारचा वेग अधिक असल्याने ती रस्त्याच्या कडेला चार वेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, कार चालकसुद्धा गंभीर जखमी असून, त्याला १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गोंदिया- बालाघाट बायपास मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातच हा अपघात ज्याठिकाणी घडला तो अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसमोरच हा अपघात घडल्याने जवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला अपघात

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया-बालाघाट मार्गावरील अपघात हा कारने टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात घडल्याचे बोलले जाते. कारचा वेग अधिक असल्याने ती रस्त्याच्या कडेला चारदा पलटी झाली.

खोब्रागडेंचा गेला नाहकच बळी

विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले शशिकांत खोब्रागडेंना दरराेज सायंकाळी फिरायला जायची सवय होती. ते नियमित गोंदिया- बालाघाट मार्गावर फिरायला जायचे. गुरुवारीसुद्धा ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फिरायला जात होते. भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने खोब्रागडे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgondiya-acगोंदिया