गोंदिया :खंडणी वसूलीसाठी खूनासारखेही खोटे आरोपी करून सामान्यांना तुरूंगात डांबण्याची तयारी करणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन खंडणीबाजांनी ७ लाख रूपये स्वराज ट्रॅक्टरच्या एजेन्सी मालकालाकडून वसूलही केले. परंतु पैश्याची हाव कमी होतांना दिसत नसल्यामुळे पिडीत व्यक्तीने गोंदिया शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
गोंदियातील स्वराज ट्रॅक्टरच्या एजेन्सी मालक राजेश भगवानभाई गज्जर (४४) रा. ३०४ साईविला, रिंग रोड गोंदिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोंदिया शहरातील एक पुरूष व गिरोला येथील एक महिला अशा दोघांनी ३ नोव्हेंबर रोजी राजेश यांच्या स्वराज ट्रॅक्टरचे शोरुम मध्ये जाऊन खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यामुळे १० ते १२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयात राजेश गज्जर विरूध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये खोटी तक्रार केली होती. ती तक्रार परत घेण्याकरीता १० लाख रूपयाची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याच्या विरोधात शोरुम समोर उपोषण करण्याची धमकी दिली होती. त्यांना वारंवार पैशाची मागणी करीत होता.
२७ जुलै २०२२ रोजी तक्रार मागे घेण्याकरीता ७ लाख रूपये घेतले होते. तरीही पैसे घेण्याची हाव कमी होत नसून दोन्ही आरोपी त्यांना वारंवार त्रास देत असल्याने दोन्ही आरोपीविरूधञद तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३८४,३८९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.