आॅनलाईन लोकमतकाचेवानी : गाव हागणदारीमुक्त करुन स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास गावात रोगमुक्त वातावरण निर्माण होईल. सर्वांच्या घरी शौचालय असावे. त्याचा नियमित वापर होणे गरजेचे आहे. शौचालय नसणाºया व वापर करीत नसल्यास त्यांना शासनाच्या मिळणाºया सुविधांना मुकावे लागणार, असा इशारा तिरोडा पं.स. चे गटविकास अधिकारी जावेद ईनामदार यांनी दिला.बरबसपुरा येथे गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारी मुक्त अभियान राबविण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या सभेत ते मार्गदर्शन करीत होते.गुडमॉर्निंग पथकात गटविकास अधिकारी जावेद इनामदार, गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत, कृषी विस्तार अधिकारी जी.एम. भायदे, सरपंच नरेश असाटी, उपसपरंच प्रमिला कोसरे, भूवन पेशने, सुरेश पटले, राठोड, बिसेन, ग्रा.पं. सदस्य उषा पटले, रत्नमाला शेंदरे, दिनेश पटले, गोपाल नेवारे, वीणा कटरे, मुख्याध्यापक हरिणखेडे, अंगणवाडी सेविका श्यामकला रहांगडाले, प्रेरक पायल डोंगरे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या नेतृत्वात बरबसपुरा गावात सकाळी ४.३० वाजता गुडमॉर्निंग पथक पोहोचले. त्यानंतर सरपंच नरेश असाटी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गावाचे भ्रमण करण्यात आले.संपूर्ण रस्ते आणि तळ्यावर जावून गुडमॉर्निंग पथकाने नजर ठेवली. मात्र बाहेर शौचास जाणारा एकही व्यक्ती आढळला नाही.यानंतर गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी आपल्या सहकाºयांसह ग्रामस्थांच्या घरी जावून शौचालयांची पाहणी केली.तसेच परिवारातील कोणताही सदस्य उघड्यावर शौचास जाणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे लक्ष देण्यात आले नाही तर शासनाकडून मिळणाºया सुविधा बंद करण्यात येईल असे सांगितले. याची गावातील कुटुंब प्रमुखांनी समजून घ्यावे. असेही इनामदार यांनी बजावून सांगितले. यावेळी गविअ इनामदार यांना अनेक नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणार नाही, असे आश्वासन दिले.दंडात्मक कारवाईची भीतीगटविकास अधिकारी इनामदार यांच्या नेतृत्वात सतत गुडमॉर्निंग पथकाच्या गावो-गावी धाडी पडत असल्याने नागरिकांमध्ये आपल्यावर दंडात्मक कारवाई तर होणार नाही, याची भीती निर्माण झाली आहे. तसेच काही घरी शौचालयांची सुविधा नसल्याने किंवा सुस्थितीत नसल्यामुळे फजिती झाली आहे.सभेद्वारे मार्गदर्शनउच्च प्राथमिक शाळेत सभा घेण्यात आली. यात गविअ जावेद इनामदार यांनी शौचालयाचे महत्व सांगून उघड्यावर शौचास जाण्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली. या वेळी गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत यांनी मार्गदर्शन केले. सरपंच नरेश असाटी यांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या गुडमॉर्निंग पथकाला यश मिळवून देवू. तसेच गावात स्वच्छता राखून ठेवू, असे आश्वासन दिले.