शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे सावट दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 9:21 PM

मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे.

ठळक मुद्दे कालव्यांची दुरूस्ती : तीन तालुक्यांतील ३५ हजार हेक्टर क्षेत्राला होणार सिंचन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे. शेतकरी खरीप व रब्बी हंगामात पिके घेवू शकणार असून त्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही.सिंचन व शासनाच्या रेकार्डवर गोंदिया जिल्ह्यातील ७० टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ३० ते ४० टक्के क्षेत्रालाच सिंचन होते. वैनगंगा, बाघ आणि इतर मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून कालव्यांव्दारे शेतीला सिंचनाची सोय केली जाते. बाघ प्रकल्पातंर्गत ३५० किमी. कालव्यांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोहचविले जाते होते. मात्र मागील ५० वर्षांपासून कालव्यांची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे कालवे केवळ नावापुरते ठरत होते. सिंचनाची सुविधा असतानाही त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत होती.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेतला. त्यानंतर यासर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून बाघ प्रकल्पातंर्गत येणाºया ३५० किमी.च्या कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यासाठी किती निधी आणि यंत्रणेची गरज आहे. ही सर्व माहिती घेवून त्यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. मागील दोन महिन्यांपासून पोकलॅन्ड आणि डोजरव्दारे दिवसरात्र कालव्यांच्या खोलीकरण व दुरूस्तीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास २० ते ३० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे.आ. अग्रवाल यांनी कालवा दुरूस्तीचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पोकलॅन्ड आणि डोजर मशिनची संख्या वाढविण्यात येणार आहे. रविवारी आ.अग्रवाल यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कालवा दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. यावेळी अग्रवाल यांनी दुरूस्तीपूर्वी आणि दुरूस्तीनंतर कालव्यांची स्थिती कशी याची वास्तविक स्थिती सुद्धा दौºया दरम्यान निदर्शनास आणून दिली.तीन योजनांमुळे सिंचनाची समृद्धीगोंदिया जिल्हा पाण्याने समृद्ध असला तरी त्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने आणि वितरण प्रणालीची योग्य व्यवस्था नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी व सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी आ.अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नाने रजेगाव-काटी, तेवढा-शिवणी, नवेगाव-देवरी या तीन महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतल्या. यापैकी रजेगाव -काटी आणि तेढवा-शिवणी योजना पूर्ण झाली आहे. नवेगाव-देवरी योजनेच्या कामाला सुरूवात होणार आहे. या तीन योजनामुळे गोंदिया तालुक्यातील शेतकरी सिंचनात समृद्ध होणार आहे.तीन तालुक्यांना लाभबाघ प्रकल्पातंर्गत ३५० किमी. कालवे आहे. या कालव्यांतर्गत गोंदिया तालुक्यातील ६८, आमगाव तालुक्यातील ४९ आणि सालेकसा तालुक्यातील ४६ अशा एकूण १६३ गावातील सिंचनाची सोय केली जाते. मात्र मागील ५० वर्षांपासून या कालव्यांच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने या ३५० किमी. कालवा दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने या १६३ गावातील ३५ हजार ७१८ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.देखभाल दुरूस्तीचा निधी जातो कुठे?विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळाच्या गोंदिया विभागाला दरवर्षी कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी ३ ते ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यानंतरही कालव्यांची दुरवस्था झाली आहे. कालव्यांमध्ये गवत उगवले असून कित्येक कालव्यांचे लोखंडी गेट देखील गायब झाले आहेत. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी दिला जाणारा हा निधी जातो कुठे असा प्रश्न सुद्धा आ.अग्रवाल यांनी उपस्थित केला.

कालव्यांच्या दुरूस्तीमुळे हजारो हेक्टर शेती सिंचनखाली येण्यास मदत होणार आहे. एका पाण्याअभावी शेतकऱ्यांना पिके गमाविण्याची पाळी येणार नसून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास निश्चित मदत होईल.- गोपालदास अग्रवालआमदार,गोंदिया विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल