अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्याची रेल्वे विभागाने दिलेली डेडलाईन संपली असताना अद्यापही पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत पूल पाडण्यासाठी बजेटमध्ये तरतूद होवून निधी मिळत नाही तोपर्यंत जीर्ण उड्डाणपूल पाडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे बजेटमध्ये तरतूद केव्हा होणार आणि जीर्ण पूल केव्हा पाडणार हे अनिश्चित असून तोपर्यत शहरवासीयांनो तुम्ही धोका पत्थकारा असेच धोरण प्रशासनाचे असल्याचे दिसून येते.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पूर्णपणे र्जीण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाणपुलाचा भाग पूर्णपणे जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धोका ओळखून रेल्वे विभागाने सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे पत्र दिले होते.मात्र शहरातील नवीन उड्डाणपूल सदोष असल्याने आणि जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे जीर्ण उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर आॅडिट करुन या पुलावरुन केवळ दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना प्रवेश सुरू ठेवला.मात्र रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवून सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास सांगितले होते.हा कालावधी डिसेंबर महिन्यात पूर्ण झाला. मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून पूल पाडण्यासाठी कुठलीच प्रक्रिया सुरू केली नाही.तर ज्या विभागावर याची जबाबदारी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाºयाने जोपर्यंत नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी आणि जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली जात नाही. तोपर्यंत जीर्ण उड्डाणपूल पाडणे शक्य नसल्याचे सांगितले.त्यामुळे निधी उपलब्ध होईपर्यंत शहरवासीयांना जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा धोका पत्थकारावा लागणार हे मात्र निश्चित आहे.जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी लागणार दीड कोटी रुपयेशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम एखाद्या एजन्सीला कंत्राट देवून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र पूल पाडण्यासाठी जोपर्यंत शासनाकडून निधी मिळत नाही. तोपर्यंत पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार नाही.८४ कोटी रुपयांच्या नवीन उड्डाणपुलाचा प्रस्तावसार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे नुकताच मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळून बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बजेटमध्ये तरतूद होईपर्यंत धोका पत्करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 9:26 PM
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्याची रेल्वे विभागाने दिलेली डेडलाईन संपली असताना अद्यापही पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात झाली नाही.
ठळक मुद्देजीर्ण उड्डाणपुलाची समस्या : सार्वजनिक बांधकाम विभागाने केले हात वर, शहरवासीयांच्या समस्येकडे दुर्लक्ष