गोदिया : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते मंगळवारी (दि.१ )े कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. पालकमंत्री बडोले यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे आजच्या पथसंचलनात सर्व महिला प्लाटूनचा समावेश होता. परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक दिपाली खन्ना यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले. या पथसंचलनात पोलीस मुख्यालयाच्या महिला प्लाटूनचे नेतृत्व सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव, पोलीस ठाणे महिला प्लाटूनचे नेतृत्व नक्षल सेलच्या पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे, जलद प्रतिसाद पथकाचे नेतृत्व डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निशा वानखेडे, पोलीस ठाणे महिला प्लाटूनचे नेतृत्व गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संध्या सोमनकर, दंगा नियंत्रण पथकाचे नेतृत्व दर्शना राणे, नेहा मांडवे, होमगार्ड महिला प्लाटूनचे नेतृत्व जी.पी. बल्ले, नूतन विद्यालयाच्या भावना समुंद्रे यांनी केले.या पथसंचलनात निर्भया पथक, फिरते न्याय वैद्यक पथक, श्वान पथक, बाँब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बिट मार्शल, बँड पथक व रुग्णवाहिका यांचा सहभाग होता. या वेळी महिला स्वयं सुरक्षा प्रात्यिक्षक पोलीस शिपाई, कमांडो मार्शल आर्ट ट्रेनर जनार्धन कुसराम यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस रिना चव्हाण व आशा मेश्राम यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. या प्रात्यिक्षकात दीक्षा तांडेकर, सरिता लिल्हारे, प्रियंका निनावे, पल्लवी गजभिये, अनिता राऊत, मेघा उईके, प्रियंका मिश्रा, रोशनी चव्हाण, ज्योत्स्ना बांडेबुचे, जयश्री चवळे, शितल चवळे व संगीता कल्लो यांनी सहभाग घेतला.नक्षलवादयांविरूध्द लढणे, छेडखानीविरूध्द लढणे यासह अनेक प्रात्यिक्षके करून दाखिवण्यात आली. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भीमराव फुलेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 12:17 AM
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते मंगळवारी (दि.१ )े कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. पालकमंत्री बडोले यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ठळक मुद्देमहिला प्लाटूनने केले पथसंचलन