खोटे आश्वासन देणारे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:24 IST2018-08-05T00:23:11+5:302018-08-05T00:24:05+5:30
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

खोटे आश्वासन देणारे सरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असून भाजप सरकार खोटे आश्वासन देणारी सरकार असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.
तालुक्यातील पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र नेहमीच कॉँग्रेस पक्षाचे बळकट गड राहिले आहे. मात्र मागील काही काळात कॉँग्रेसचा गड तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते चुकीचा प्रचार करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. मात्र आता जनतेलाही भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखू आला आहे, त्याचे परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले असल्याचेही आमदार अग्रवाल सांगितले.
मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, रूद्रसेन खांडेकर, विक्की बघेले, लक्ष्मी रहांगडाले, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मदन लिल्हारे, ओमप्रकाश रहांगडाले, डॉ. योगेश बिसेन, कृपाल लिल्हारे, प्रकाश तांडेकर, राजेश ठाकरे, संतोष ठाकरे, दिनेश तुरकर, अनिल चुलपार, लखन पटले, नलिनी शहारे, मधु हनवते यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.